टेनिसफॅन्सच्या मुखी एकच नाव... ली ना ओेss ली ना!

Last Updated: Saturday, January 25, 2014, 19:27

चीनच्या ली ना हिने ऑस्ट्रेलिया ओपनच्या विजेतेपदाला गवसणी घातली आहे. चौथ्या सीडेड ली नाने फायनलमध्ये स्लोव्हाकियाच्या डॉमिनिका सिबुलकोव्हाला ७-६, ६-० नं पराभूत करत आपल्या करियरमध्ये प्रथमच ऑस्ट्रेलिया ओपनच्या विजेतेपदावर नाव कोरलं.

इंग्लंडचा कॅप्टन ‘कूक’नं मोडला सचिनचा रेकॉर्ड

Last Updated: Saturday, December 28, 2013, 23:06

इंग्लंड क्रिकेट टीमचा कॅप्टन अॅलेस्टर कूक यानं मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचा एक रेकॉर्ड मोडलाय. मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचा सर्वात कमी वयात आठ हजार धावांचा टप्पा पार करण्याचा रेकॉर्ड कूकनं मोडीत काढला.

डॉल्फिन’च्या नवीन प्रजातीचा शोध

Last Updated: Thursday, October 31, 2013, 15:29

‘डॉल्फिन’ मासा त्याच्या प्रेमळ, मैत्रीपूर्ण वागणूकीसाठी तसेच हुशारीसाठी प्रसिद्ध आहे. लहान मुलांपासून ते मोठ्या माणसांपर्यंत ‘डॉल्फिन’ हा सर्वांच्याच आकर्षणाचा आणि उत्सुकतेचा भाग ठरलाय. याच उत्सुकतेची परिणीती म्हणजे, ऑस्ट्रेलियाच्या उत्तरी समुद्र किनाऱ्याजवळ हंपबैक डॉल्फिनच्या एका नवीन प्रजातीचा मासा दिसलाय.

वर्ल्डकप २०१५ : भारताचा पहिलाच सामना पाकशी

Last Updated: Tuesday, July 30, 2013, 11:30

क्रिकेट वर्ल्डकप २०१५ चं वेळापत्रक जाहीर झालंय. हे सामने ऑस्ट्रेलिया-न्यूझीलंडमध्ये रंगणार आहेत. भारतासाठी महत्त्वाची गोष्ट म्हणजे भारताचा पहिलाच सामना पाकशी रंगणार आहे.

ऑस्ट्रेलियामध्ये आता शाळेत हिंदीचे धडे

Last Updated: Monday, October 29, 2012, 16:54

भारताबरोबरच आशियाई देश आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील संबंध वृध्दींगत होण्यासाठी ऑस्ट्रेलियाने नवा अध्याय शोधून काढला आहे. त्या दृष्टीने एक पाऊल टाकण्यात आले आहे. संबंध वाढीसाठी ऑस्ट्रेलियांतील शाळांमध्ये हिंदीचे धडे शिकविले जाणार आहेत.

भारत पराभवाच्या दाराशी...

Last Updated: Sunday, February 5, 2012, 17:17

मेलबर्न येथे सुरू असलेल्या पहिल्या वन डे मॅचमध्ये टीम इंडियाने अक्षरश: नांगी टाकली आहे. आतापर्यंत भारताच्या ८ विकेट गेल्या तर फक्त १२५ रन्सपर्यंतच मजल मारता आली आहे. त्यामुळे आता भारताचा पराभव जवळजवळ निश्चित झाला आहे. भारताने फंलदाजीमध्ये अतिशय खराब कामगिरी केली त्यांचा फटका त्यांना नक्की बसणार आहे.

टीम इंडियाचं काही खरं नाही....

Last Updated: Sunday, February 5, 2012, 17:17

भारत वि. ऑस्ट्रेलिया पहिल्या वनडे मॅचमध्ये भारताने पुन्हा एकदा नांगी टाकण्यास सुरवात केली आहे भारतातर्फे पहिले आघाडीचे आणि मधल्या फळीतील खेळाडू फक्त हजेरी लावण्याचे काम करत गेले. भारताची चौथी विकेट गेल्यानंतर सुरैश रैना हा देखील फक्त हजेरी लावण्याचे काम करून गेला.

मायकल क्लार्कची दमदार खेळी

Last Updated: Wednesday, January 4, 2012, 13:23

ऑस्ट्रेलियाचा कर्णधार मायकल क्लार्क यांने कसोटीत पहिले व्दिशतक झळकावले. त्याने दमदार खेळी करताना २०९ धावा केल्या.

पाँटिंगची खेळी समाप्त, क्लार्कची झुंज

Last Updated: Wednesday, January 4, 2012, 13:23

सिडनीतील दुसऱ्या कसोटीवर ऑस्ट्रेलियाची पकड असतानाच रिकी पॉन्टिंगला ईशांत शर्माने सचिन तेंडुलकरवी झेलबाद केले. रिकी पॉन्टिंग दीड शतकी खेळी करील असे वाटत असताना रिकीचा डाव १३४ वर संपुष्टात आला.

ऑस्ट्रेलिया उभारणार धावांचा डोंगर

Last Updated: Wednesday, January 4, 2012, 13:24

सिडनीतील दुसऱ्या कसोटीवर ऑस्ट्रेलियाने चांगली पकड निर्माण केली आहे. केवळ तीन विकेट गमावून ३०७ रन्स केल्या आहेत.

ऑस्ट्रेलियाची मजबूत पकड

Last Updated: Wednesday, January 4, 2012, 08:13

सिडनीत टीम इंडियाच्या आघाडीच्या बॅट्समननी पुन्हा एकदा निराशा केली असताना ऑस्ट्रेलियाने आपली पडझड सावरत चांगली सुरूवात केली आहे. केवळ तीन विकेट गमावून २३६ रन्स केल्या आहेत.

टीम इंडिया अडचणीत

Last Updated: Tuesday, January 3, 2012, 16:54

मेलबर्न टेस्टमध्ये बॅट्समनच्या कामगिरीमुळे टीम इंडियाला पराभव सहन करावा लागला होता आणि सिडनी टेस्टमध्येही परिस्थिती फारशी वेगळी दिसली नाही. बॅट्समननी पुन्हा एकदा निराशा केली आणि टीम इंडिया चांगलीच अडचणीत सापडली.

उमेश यादवपुढे ऑस्ट्रेलियाचे लोटांगण

Last Updated: Wednesday, December 28, 2011, 10:48

टीम इंडियाचा वेगवान गोलंदाज उमेश यादवने ऑस्ट्रेलियाला दौऱ्यात झटपट तीन गडी बाद करून चमदार कामगिरी केली. त्यामुळे ऑस्ट्रेलियाला ५१ रन्सची आघाडी मिळूनही चांगली संधी उठवता आली नाही.

बॉक्सिंग टेस्टमध्ये दडलयं काय?

Last Updated: Tuesday, December 27, 2011, 17:57

बॉक्सिंग-डे टेस्टमध्ये ऑस्ट्रेलियन टीमला पहिल्या इनिंगमध्ये ३३३ रन्सवर रोखण्यात टीम इंडियाला यश आलं. दुसऱ्या दिवसाच्या पहिल्याच सेशनमध्ये झहीर खानची बॉलिंग चांगलीच चालली. त्यानं सुरुवातीलाच कांगारुंना दोन धक्के दिले. त्यानं ब्रॅड हॅडिनला २७ रन्सवर आणि पीटर सीडलला ४१ रन्सवर आऊट केले.

ऑस्ट्रेलियाचा कसोटी संघ जाहीर

Last Updated: Saturday, December 24, 2011, 09:34

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात २६ डिसेंबरपासून कसोटी सामन्यांना सुरूवात होत आहे. पहिल्या कसोटी सामन्यासाठी ऑस्ट्रेलियाचा संघ जाहीर करण्यात आला आहे. संघाचे नेर्तृत्व मायकल क्लार्क करणार आहे.