Last Updated: Tuesday, November 13, 2012, 13:39
www.24taas, लंडन सचिन तेंडुलकरला जास्त मान देण्याची गरज नाही.. असं म्हणत इंग्लंडच्या अँडरसनने सचिन तेंडुलकरला चांगलच डिवचलं आहे. कसोटी मालिकेला सुरुवात होण्यास दोन दिवस उरलेले असताना इंग्लंडने आतापासूनच माइंडगेम सुरू केला आहे. इंग्लंडच्या खेळाडूंनी खेळपट्टीवर सचिन तेंडुलकरला अधिक मान देण्याची गरज नसल्याचे मत त्याने व्यक्त केले आहे.
सचिनची ही अखेरची कसोटी मालिका असू शकते, असे म्हटले जात आहे. यामुळे आमच्यावर काहीच परिणाम होणार नाही. मला त्याच्याविरुद्ध गोलंदाजी करणे आवडते.
या स्तरावर सर्वश्रेष्ठ फलंदाजाविरुद्ध गोलंदाजी करणे, ही गोलंदाजासाठी एक परीक्षाच असते, असे त्याने म्हटले. भारत-इंग्लंडदरम्यान पहिल्या कसोटीला १५ नोव्हेंबरपासून प्रारंभ होत आहे.
First Published: Tuesday, November 13, 2012, 13:30