Last Updated: Wednesday, April 30, 2014, 12:47
www.24taas.com, झी मीडिया, शारजाआयपीएल सामने सुरु असले तरी राजस्थानमध्ये विरोट कोहली आपली मैत्रिण अभिनेत्री अनुष्का शर्मा हिचा वाढदिवस साजरा करण्यासाठी जाणार आहे. 1 मे रोजी अनुष्काचा वाढदिवस आहे.
वेळात वेळ काढून रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु टीमचा कप्तान विराट कोहली राजस्थानमध्ये जाण्याची तयारी करीत आहे. काहीही करुन त्याला 1 मे रोजी राजस्थानमध्ये जायचे आहे. कारणही तसचं आहे अनुष्काचा जन्मदिवस आहे. अनुष्का शर्मा होम प्रोडक्शनची `एनएच10` फिल्म करीत आहे. सध्या या सिनेमाचे शुटींग राजस्थानमध्ये सुरू आहे.
अनुष्काला शुभेच्छा देणे शक्य नसल्याने काहींही शुभेच्छा देण्याचा व्हिडिओ तयार केला आहे. मात्र, विराट कोहलीला हे पटलेले नाही. तो राजस्थानला जाणे पसंत करीत आहे. विराट आणि अनुष्काने वाढदिवसाचे नियोजन केल्याची चर्चा आहे. मात्र, विराटला अनुष्कासाठी काहीतरी सरप्राइज देण्याची ईच्छा आहे.
•
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.•
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.
First Published: Wednesday, April 30, 2014, 12:41