आशिया चषक : भारत-बांग्लादेश आज लढत, Asia Cup 2014 : India vs Bangladesh

आशिया चषक : भारत-बांग्लादेश आज लढत

आशिया चषक : भारत-बांग्लादेश आज लढत
www.24taas.com, वृत्तसंस्था, फातुल्ला

आशिया क्रिकेट चषकामध्ये आज भारत आणि बांग्लादेश या दोन्ही संघात लढत होत आहे. दक्षिण आफ्रिका आणि न्यूझीलंडमध्ये सपाटून मार खाल्ल्यानंतर भारताला विजय हवा आहे. महेंद्रसिंग धोनीची धूरा विराट कोहली संभाळत आहे.

आशिया चषकातील सलामी लढतीत यजमान बांग्लादेशाला हरविण्याचे आव्हान नवा कर्णधार विराट कोहली समोर आहे. मागच्या आशिया चषकात कोहलीने चार शतके आणि तीन अर्धशतकांसह ७३२ धावा केल्या. त्यात पाकविरुद्धच्या स्पर्धेतील सर्वोच्च १८५ धावांचादेखील समावेश आहे. मात्र, आशिया चषकात त्याच्यावर दबाव असेल.

२०१२ मध्येदेखील इंग्लंड आणि ऑस्ट्रेलियाविरुद्ध सलग आठ कसोटी सामने गमावून भारत आशिया चषक खेळला होता. बांग्लादेश संघाचा सलामीवीर तमीम इक्बाल जखमी झाल्याने बाहेर आहे. अष्टपैलू शकीब अल हसन याच्यावर असभ्य वागणुकीचा ठपका ठेवून दोन सामन्यांसाठी त्याला निलंबित करण्यात आले. अनुभवी जलद गोलंदाज मुशर्रफ मुर्तझा याच्या गुडघ्यावर सूज आहे. कर्णधार मुशफिकीर रहीम याच्या बोटाला इजा झाली आहे. याशिवाय संघ निवडीतील वादामुळे बांगला संघ चर्चेत राहिला.

चेतेश्‍वर पुजारा मधल्या फळीत, कोहली स्वत: तिसर्‍या आणि अजिंक्य रहाणे चौथ्या स्थानावर येईल. याशिवाय दिनेश कार्तिक, रवींद्र जडेजा आणि रविचंद्रन अश्‍विनकडून चमकदार कामगिरीची आशा आहे. मध्यम जलद गोलंदाज असलेला स्टुअर्ट बिन्नी संघासाठी कशी कामगिरी करेल, याकडे लक्ष आहे.


इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Wednesday, February 26, 2014, 10:18


comments powered by Disqus