टीम सिलेक्शनमध्ये मुलाचं नाव आल्यास बैठकीतून उठतो - रॉजर बिन्नी

Last Updated: Thursday, June 19, 2014, 16:00

भारतीय क्रिकेट टीमचे निवडकर्ते आणि माजी क्रिकेटपटू रॉजर बिन्नी म्हणाले, जेव्हा टीमचं सिलेक्शन होतं तेव्हा जर त्यांच्या मुलाचं स्टुअर्ट बिन्नीच्या नावावर चर्चा होत असेल तेव्हा मी बैठकीतून उठून जातो. इंग्रजी वृत्तपत्रासोबत केलेल्या बातचितमध्ये ते बोलत होते.

विराट वन डेत नंबर, भारत तिसरा

Last Updated: Thursday, June 5, 2014, 16:20

भारतीय क्रिकेट टीम आयसीसी वन डे रँकिंगमध्ये एक स्थानाने मागे पडली असून आता भारताचा तिसरा क्रमांक झाला आहे. पण आनंदाची गोष्ट म्हणजे भारताचा स्टार फलंदाज विराट कोहली अजूनही फलंदाजांच्या यादीत क्रमांक १ वर कायम आहे.

आशिया चषक : भारत-बांग्लादेश आज लढत

Last Updated: Wednesday, February 26, 2014, 10:19

आशिया क्रिकेट चषकामध्ये आज भारत आणि बांग्लादेश या दोन्ही संघात लढत होत आहे. दक्षिण आफ्रिका आणि न्यूझीलंडमध्ये सपाटून मार खाल्ल्यानंतर भारताला विजय हवा आहे. महेंद्रसिंग धोनीची धूरा विराट कोहली संभाळत आहे.

श्रीलंकेने पाकिस्तानला धूळ चारली

Last Updated: Wednesday, February 26, 2014, 10:07

श्रीलंका आणि पाकिस्तान यांच्यात झालेल्या वन डे सामन्यात पाकिस्तानचा पराभवाचा धक्का सहन करावा लागला आहे. लाहिरू तिरिमाने (१०२) याच्या दमदार शतकानंतर लसिथ मलिंगाने (५-५२) केलेल्या भेदक गोलंदाजीच्या बळावर श्रीलंकेने आशिया चषक स्पध्रेच्या पहिल्याच लढतीत पाकिस्तानचा १२ धावांची पराभव केला.

स्कोअरकार्ड : भारत X न्यूझीलंड (पाचवी वन डे)

Last Updated: Friday, January 31, 2014, 08:15

भारत विरुद्ध न्यूझीलंड वनडे सीरिजमधली शेवटची म्हणजेच पाचवी मॅच आज खेळली जातेय. याआधी झालेल्या तीन मॅच भारतानं गमावल्यात तर एक वन डे ड्रॉ झालेली आहे.

न्यूझीलंड विजयी, भारताने मालिका गमावली

Last Updated: Tuesday, January 28, 2014, 19:29

भारताने न्यूझीलंडसमोर २७९ धावांचे टार्गेट ठेवले होते. न्यूझीलंडने ३ विकेटच्या बदल्यात ते सहज पार केले आणि ७ विकेट्सनी दणदणीत विजय मिळवला आहे. पराभवामुळे पाच सामन्यांची वन डे मालिका भारताने ३-० ने गमावली.

भारत X न्यूझीलंड : जडेजा फॉर्मात, मॅच टाय

Last Updated: Saturday, January 25, 2014, 19:08

शेवटच्या बॉलपर्यंत रंगतदार झालेली भारत आणि न्यूझीलंड ऑकलंड वन-डे अखेर टाय झाली. रवींद्र जाडेजानं नॉटआऊट ६६ रन्सची झुंजार इनिंग खेळत टीम इंडियाला मॅचमध्ये कमबॅक करून दिलं. मात्र, त्याला आपल्या टीमला चित्तथरारक मॅचमध्ये  विजय साकारून देता आला नाही.

टीम इंडियाला वनडेत नंबर १ कायम राखण्याचे आव्हान

Last Updated: Friday, January 17, 2014, 17:26

भारतीय क्रिकेट संघाचा न्यूझीलंड दौरा १९ जानेवारीपासून सुरू होत आहे. न्यूझीलंड विरूद्ध भारत पाच एकदिवसीय सामने खेळणार आहे. सध्या भारतीय संघ हा १२० गुणांसह आयसीसीच्या एकदिवसीय क्रमवारीत प्रथम क्रमाकांवर आहे.

पावसामुळे भारत-द.आफ्रिका तिसरी वन डे रद्द

Last Updated: Thursday, December 12, 2013, 10:23

लागोपाट दोन पराभवानंतर तिसर्‍या वनडेतही भारताचा पराभव दिसत होता. मात्र, भारताच्या मदतीला पाऊस धाऊन आला. दोन तास कोसळलेल्या पावसामुळे सामनाच रद्द करावा लागला. त्यामुळे भारताचा व्हाईटवॉश टळला आहे.

LIVE स्कोअरकार्ड : भारत X द. आफ्रिका (तिसरी वन डे)

Last Updated: Wednesday, December 11, 2013, 17:22

भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिकेची तिसरी आणि शेवटची वन डे सेन्चुरीयन मैदानावर सुरू झालीय. दक्षिण आफ्रिकेनं टॉस जिंकून प्रथम बॅटींगचा निर्णय घेतलाय. त्यामुळे भारतासमोर द. आफ्रिकेच्या फलंदाजांना लवकरात लवकर बाद करण्याचं आव्हान आहे...

भारताचा सीरिजवर ताबा; धवनची शानदार सेंच्युरी!

Last Updated: Wednesday, November 27, 2013, 20:07

कानपूर वन-डेमध्ये टीम इंडियानं वेस्ट इंडिजवर ५ विकेट्सने मात करत वन-डे सीरिजवर कब्जा केला. या विजयासह भारतानं तीन वन-डे मॅचेसची सीरिज २-१ नं जिंकली.

भारताचा पराभव, विंडीजनं मालिकेत साधली बरोबरी!

Last Updated: Sunday, November 24, 2013, 23:35

विशाखापट्टणम वन-डेमध्ये रंगतदार लढतीत वेस्ट इंडिजनं टीम इंडियावर दोन विकेट्सनी मात केली.

रोहीतच्या `डबल सेन्चुरी`नं खेचून आणला विजयश्री

Last Updated: Saturday, November 2, 2013, 22:22

बंगळुरु वन-डेमध्ये टीम इंडियानं ऑस्ट्रेलियावर ५७ रन्सनी मात केली. या विजयासह भारतीय टीमनं सात वन-डे मॅचेसची सीरिज ३-२ नं जिकंली. २०९ रन्सची धडाकेबाजा इनिंग खेळणार रोहित शर्मा टीम इंडियाच्या विजयाचा शिल्पकार ठरला.

सचिन-सेहवागनंतर... रोहीतची डबल सेन्चुरी!

Last Updated: Saturday, November 2, 2013, 23:24

ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळल्या जाणाऱ्या वनडे श्रृंखलेच्या सातव्या मॅचमध्ये रोहीत शर्माची तुफानी खेळी क्रिकेटप्रेमींना पाहायला मिळाली. शनिवारी, खेळताना सिक्स आणि फोरची बरसात करत रोहितनं डबल सेन्चुरी ठोकलीय.

भारताची ऑस्ट्रेलियावर दणदणीत मात; सीरिज जिंकली!

Last Updated: Sunday, November 3, 2013, 09:03

नागपुरात मिळविलेल्या धमाकेदार विजयानंतर भारतीय संघ मालिका विजयासाठी सज्ज झाला आहे. बंगळुरू येथील सातवी वन-डे चिन्नास्वामी स्टेडियमवर ‘धोनी ब्रिगेड’चे फलंदाज जोरदार फटकेबाजीने ऑस्ट्रेलियन गोलंदाजीच्या नरकासुराचा वध करून विजयाचा दीपोत्सव झळकणार का, याची उत्सुकता आहे. ऑस्ट्रेलियाने टॉस जिंकून फिल्डींगचा निर्णय घेतला आहे.

सहाव्या वन डेसाठी टीम इंडिया सज्ज!

Last Updated: Wednesday, October 30, 2013, 09:08

भारत आणि ऑस्ट्रेलियाच्या संघांमधल्या वन डे सीरिजचा आज सहावी मॅच नागपूरमध्ये होणार आहे.सात सामन्यांच्या या मालिकेत ऑस्ट्रेलिया २-१ अशी आघाडी घेतलीय. चौथी आणि पाचवी वन-डे मॅच पावसामुळं रद्द झाल्यानं भारताला आता ही सीरिज जिंकण्यासाठी पुढच्या दोन्ही मॅच जिंकणं आवश्यक आहे. त्यामुळं ही मॅच म्हणजे टीम इंडियासाठी ‘करो या मरो’ची स्थिती आहे.

टीम इंडियात कमी तिथे `शमी`!

Last Updated: Thursday, October 24, 2013, 21:08

पावसात वाहून गेलेल्या रांची वन-डेमुळे टीम इंडियाचं नंबर वन स्थान अबाधित राहिलं असलं. तरी टीम इंडियासाठी रांची वन-डेत आणखी एक चांगली बातमी मिळाली ती मोहम्मद शमीच्या रूपात...

तिसरा सामना, धोनीच्या मेहनतीवर इशांतने फेरले पाणी

Last Updated: Saturday, October 19, 2013, 21:27

मोहालीमध्ये आज भारत ऑस्ट्रेलिया दरम्यान तिसरा सामना सुरू झाला आहे. जयपूरमध्ये झालेल्या ऐतिहासिक विजयानंतर भारतीय संघाचा आत्मविश्वास दुणावलाय. ऐतिहासिक विजयाची पुनरावृत्ती टीम इंडिया करेल का याचीच उत्सुकता आहे. तर ऑस्ट्रेलियासमोर चांगली कामगिरी करुन पुन्हा कमबॅक करण्याचे आव्हान असेल.

कोहलीनं मोडला सेहवागचा रेकॉर्ड; भारताचा विजय

Last Updated: Wednesday, October 16, 2013, 22:16

जयपूरमध्ये टीम इंडियाने सर्वात मोठ्या विजयाची नोंद केली. ३६० रन्सच्या सर्वाधिक मोठ्या स्कोअरचा पाठलाग करताना टीम इंडियाने कांगारुंवर नऊ विकेट्सने दणदणीत विजय साकारला.

स्कोअरकार्ड : कांगारूंना धू-धू धुतले

Last Updated: Wednesday, October 16, 2013, 20:57

स्कोअरकार्ड : भारत vs ऑस्ट्रेलिया दुसरी वन डे

टीम इंडिया सीरिजमध्ये कमबॅक करण्यासाठी सज्ज...

Last Updated: Tuesday, October 15, 2013, 16:13

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील दुसरी वन-डे मॅच जयपूरच्या सवाई मानसिंग स्टेडियमवर रंगणार आहे. पहिली मॅच गमावल्यानंतर सीरिजमध्ये कमबॅक करण्याचं आव्हान टीम इंडियासमोर असणार आहे

ऑस्ट्रेलियासमोर टीम इंडियानं गुडघे टेकले

Last Updated: Sunday, October 13, 2013, 23:04

ऑस्ट्रेलियाने विजयादशमीच्या मुहूर्तावर सीमोल्लंघन करत टीम इंडियाचा पुण्यात झालेल्या सीरिजच्या पहिल्या वन-डेत ७२ रन्सनं पराभव करून टी-२०मध्ये झालेल्या पराभवाची परतफेड केली.

स्कोअरकार्ड : भारत vs ऑस्ट्रेलिया, वन डे

Last Updated: Sunday, October 13, 2013, 23:09

भारत vs ऑस्ट्रेलिया वन डे स्कोअरकार्ड

सर जाडेजा ‘नंबर वन’!

Last Updated: Monday, August 5, 2013, 09:36

टीम इंडियाचा अव्वल स्पिनर रवींद्र जाडेजानं आयसीसी वन-डे रँकिंगमध्ये अव्वल क्रमांकावर झेप घेतलीय.

'...स्वत:बद्दल शाश्वती नव्हती, म्हणून निवृत्ती'

Last Updated: Tuesday, February 5, 2013, 09:17

२०१५ च्या वर्ल्डकप टीममध्ये मी स्वत:ला पाहू शकलो नाही त्यामुळेच टीम इंडियाचं हित लक्षात घेऊन वन डे क्रिकेटमधून निवृत्त होण्याचा निर्णय घेतला, असं मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर यानं म्हटलंय.

मोहालीत चौथा सामना, इंडियाला विक्रमाची संधी

Last Updated: Tuesday, January 22, 2013, 19:20

मोहालीतील चौथ्या वनडेत कॅप्टन कूल महेंद्रसिंग धोनीला अजून एक नवा विक्रम रचण्याची संधी आहे.भारताला सर्वाधिक वनडे विजय मिळवून देणा-या कॅप्टन्सच्या लिस्टमध्ये धोनीला दुस-या क्रमांकावर झेप घेण्याची संधी आहे. धोनीच्या नेतृत्वात टीम इंडियानं ७६ विजय मिळवले.

स्कोअरकार्ड : भारत X इंग्लंड... तिसरी वन-डे

Last Updated: Wednesday, January 23, 2013, 12:13

भारत विरुद्ध इंग्लड... तिसरी वनडे... नाणेफेक जिंकून भारताचा बॉलिंगचा निर्णय |

आपल्या घरात धोनी देणार इंग्लंडला मात?

Last Updated: Saturday, January 19, 2013, 09:21

टीम इंडिया आणि इंग्लंडमध्ये तिसरी लढत रांचीमध्ये रंगणार आहे. दुसऱ्या वन-डेत कमबॅक केलेल्या टीम इंडियाचा आत्मविश्वास उंचावलेला असेल तर दुसरीकडे विजयाची मालिका खंडित झाल्याने इंग्लंड टीम सावध झाली असेल.

भारत-पाक मॅच होती फिक्स

Last Updated: Monday, January 7, 2013, 18:26

कडाक्याच्या थंडीत रविवारी दिल्लीत भारत-पाक दरम्यान झालेल्या शेवटच्या वन-डेत भारताने पाकवर १० धावांनी विजय मिळवला.

आजही एकट्या धोनीवर भारताची मदार?

Last Updated: Thursday, January 3, 2013, 08:54

एक गोष्ट नक्की की, एकट्या धोनीच्या जिवावर टीम इंडियाचं नशिब बदलू शकत नाही. टीम इंडियाला सीरिजमध्ये कमबॅक करायचं असल्यास सर्व बॅट्समन्सना धोनीसारखा खेळ करावा लागणार आहे आणि याची सुरूवात कोलकाता वन-डेपासून करावी लागेल.

सचिन... तुझी आठवण येतेय पण तुझ्या गाण्यांची नाही

Last Updated: Thursday, December 27, 2012, 15:28

सध्या मसुरीला असलेल्या सचिनला चिअरअप करण्यासाठी टीम इंडियानं भारत-पाकिस्तान टी-२० मॅचमध्ये त्याला हसवण्यासाठी आणि आपल्या भावना व्यक्त करण्यासाठी काही स्पेशल पोस्टर्स झळकावले.

सचिनच्या निवृत्तीची आतली बातमी

Last Updated: Monday, December 24, 2012, 18:52

सचिनला पाकिस्तानविरूद्ध हा विक्रम करण्याची संधी होती... तरीही सचिनने हा निर्णय का घेतला याचं उत्तर प्रत्येकाला हवं आहे... आम्ही सांगतो सचिनच्या वन-डे निवृत्तीची इनसाईड स्टोरी

सचिनच्या वनडेतील अविस्मरणीय खेळी

Last Updated: Monday, December 24, 2012, 18:24

आंतरराष्ट्रीय क्रिकेटचा कोहिनूर हिरा सचिन तेंडुलकरने रविवारी वन डेमधून निवृत्ती पत्करली. १९८९ सालापासून सुरू झालेला प्रवास अखेरीस संपुष्टात आला (अर्थात कसोटीत तो खेळत राहणार हा भाग वेगळा).

सचिनबद्दल न माहित असलेल्या गोष्टी

Last Updated: Monday, December 24, 2012, 15:54

या महान फलंदाजाबद्दल तुम्हांला माहित नसलेल्या गोष्टी आता आम्ही तुम्हांला सांगणार आहे.

निवृत्तीचा निर्णयः सचिन रात्रभर झोपला नव्हता

Last Updated: Sunday, December 23, 2012, 16:44

मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरला एक दिवसीय क्रिकेटमधून निवृत्ती घेण्याचा निर्णय अतिशय अवघड होता. त्याच्यामध्ये आणखी क्रिकेट शिल्लक आहे, त्याला आणखी काही काळ खेळायचे होते.

सचिन तेंडुलकरः वन डेतील महान फलंदाज

Last Updated: Sunday, December 23, 2012, 16:32

मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने रविवारी वन डे क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली. वन डे क्रिकेटमध्ये अनेक विक्रमांना गवसणी घालणारा सचिन तेंडुलकर हा सर्वात महान फलंदाज आहे. त्यांच्यासारखा फलंदाज भविष्यात झाला नाही की भविष्यात होणार नाही.

सचिनची निवृत्ती , द्या तुमच्या प्रतिक्रिया

Last Updated: Thursday, October 10, 2013, 23:31

क्रिकेटचा देव सचिन तेंडुलकर वन डे पाठोपाठ आता कसोटी क्रिकेटलाही अलविदा करत आहे. गेली २३ वर्षं विक्रमांचे उच्चांक गाठणारा सचिन होतोय निवृत्त सचिनने आतापर्यंत केलेल्या देदिप्यमान कामगिरीला झी २४ तासचा मानाचा मुजरा.... तुम्हांला काय वाटते.... तुम्ही कसा कराल सचिनला कुर्नीसात.... कळवा तुमच्या प्रतिक्रिया...

भारताच्या लागोपाठ दोन विकेट

Last Updated: Saturday, July 28, 2012, 22:18

भारत विरुद्ध श्रीलंका वन-डे सीरिजमधली तिसरी वन-डे आज कोलंबोतल्या प्रेमदासा स्टेडियमवर सुरू आहे. श्रीलंकेचा कॅप्टन महेला जयवर्धने यानं टॉस जिंकून पहिल्यांदा बॅटींग करण्याचा निर्णय घेतलाय. उपूल थिरंगा आणि तिलकरत्ने दिलशान मैदानावर उतरले आहेत.

भारत पुन्हा आघाडी प्रस्थापित करणार?

Last Updated: Saturday, July 28, 2012, 11:19

श्रीलंकेविरूद्ध दुसरी वन-डे गमावल्यानंतर आज होणाऱ्या तिसऱ्या वन-डेमध्ये विनिंग ट्रॅकवर परतण्याचे आव्हान टीम इंडियासमोर असणार आहे. प्रेमदासा स्टेडियमवर रंगणाऱ्या तिसऱ्या वन-डेमध्ये भारतीय बॅट्समनला चांगली कामगिरी करावी लागेल.

टीम इंडियाचा दणदणीत पराभव

Last Updated: Wednesday, July 25, 2012, 09:36

भारत आणि श्रीलंका मॅच सीरिजमधील दुसरी वन-डे आज हम्बान्टोटामध्ये रंगतेय. पहिल्या वन-डेमध्ये विजय मिळवून भारतानं सीरिजमध्ये १-०नं आघाडी घेतलीय. हीआज टीम इंडियाची जमेची बाजू ठरतेय.

धोनी टीम आघाडी कायम राखणार?

Last Updated: Tuesday, July 24, 2012, 08:41

भारत आणि श्रीलंका यांच्यात दुसरी वन-डे मॅच आज हम्बान्टोटामध्ये रंगणार आहे. विजयी सलामी दिल्यामुळे टीम इंडियाचा आत्मविश्वास दुणावलाय. तर पहिल्याच मॅचमधील पराभवामुळे लंकन टीमला सीरिजमध्ये परतण्यासाठी चांगलेच कष्ट करावे लागणार आहे.

लंका दौऱ्यात भारताची विजयी सलामी

Last Updated: Saturday, July 21, 2012, 23:49

टीम इंडियानं लंका दौऱ्याची सुरुवात विजायानं केलीय. भारतानं लंकेला २१ रन्सनं पराभूत करत विजयी सलामी दिलीय.

कोहली, धोनी पहिल्या पाचमध्ये

Last Updated: Tuesday, June 5, 2012, 20:54

भारतीय क्रिकेट संघाचा प्रतिभावान खेळाडू विराट कोहली आणि कर्णधार महेंद्रसिंग धोनी यांनी आयसीसीच्या वन डे रॅकिंगमध्ये फलंदाजांच्या यादीत अनुक्रमे तिसरे आणि चौथे स्थान पटकावले आहे.

धडाकेबाज पीटरसन वन डे, टी-२०तून निवृत्त

Last Updated: Thursday, May 31, 2012, 18:55

इंग्लडचा तडाकेबंद फलंदाज आणि माजी कर्णधार केवीन पीटरसननं आज वनडे आणि टी-२० क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर करून तमाम क्रिकेटरसिकांना जबरदस्त धक्का दिला आहे. वनडेच्या भरगच्च वेळापत्रकाला कंटाळून त्यानं हा निर्णय घेतलाय आणि कसोटी क्रिकेटवर संपूर्ण लक्ष केंद्रीत करायचं ठरवले आहे.

.... अन् पॉन्टिंग रिटायर झाला

Last Updated: Tuesday, February 21, 2012, 15:30

ऑस्ट्रेलियाचा माजी कॅप्टन रिकी पॉन्टिंगने वन-डे क्रिकेटमधून रिटारयमेंट घोषित केली आहे. तसंच तो आता टेस्ट क्रिकेटवर लक्ष केंद्रित करणार असल्याचंही पॉन्टिंगने सांगितलं आहे.

कॅप्टन धोनी आता बसा बाहेर....

Last Updated: Monday, February 20, 2012, 10:37

टीम इंडियाचा कॅप्टन महेंद्र सिंग धोनी याच्यावर पुढील वन-डेसाठी बॅन लावण्यात आला आहे. ब्रिस्बेन इथं ऑस्ट्रेलियाविरूद्धच्या वन-डेमध्ये ओव्हर्सची गती कमी ठेवल्यामुळे धोनीवर हा बॅन लावण्यात आला आहे.

'गंभीर' विकेट भारतासमोर जिंकण्याचं आव्हान

Last Updated: Sunday, February 12, 2012, 17:25

अॅडलेड वन डे मध्ये भारताला गौतम गंभीरच्या रूपाने चौथा धक्का बसला. या सीरीजमध्ये फारशी चमकदार कामगिरी करू न शकलेला गौतम गंभीरने मात्र चांगली फटकेबाजी करत होता.

टीम इंडियाचं काही खरं नाही....

Last Updated: Sunday, February 5, 2012, 17:17

भारत वि. ऑस्ट्रेलिया पहिल्या वनडे मॅचमध्ये भारताने पुन्हा एकदा नांगी टाकण्यास सुरवात केली आहे भारतातर्फे पहिले आघाडीचे आणि मधल्या फळीतील खेळाडू फक्त हजेरी लावण्याचे काम करत गेले. भारताची चौथी विकेट गेल्यानंतर सुरैश रैना हा देखील फक्त हजेरी लावण्याचे काम करून गेला.

अहमदाबादमध्ये विंडिजला करतील का ‘बाद’?

Last Updated: Sunday, December 4, 2011, 14:07

वेस्ट इंडिजविरुद्धच्या वन-डे सीरिजमध्ये टीम इंडियाने २-० नं आघाडी घेतली. आता अहमदाबाद वन-डेमध्ये भारताला ३-० अशी विजयी आघाडी घेण्याची नामी संधी आहे. यंगिस्तान तुफान फॉर्ममध्ये आहे.