Last Updated: Wednesday, February 26, 2014, 23:28
www.24taas.com, झी मीडिया, मुंबई आशिया कपमध्ये टीम इंडियानं विजयी सलामी दिली. बांग्लादेशचा भारतानं ६ विकेट्सनं पराभव केला.
विराट कोहलीनं १३६ रन्सची कॅप्टन्स इनिंग खेळत आपल्या टीमला विजय मिळवून दिला. कोहलीच्या या `विराट` इनिंगमुळे त्याला `मॅन ऑफ द मॅच`च्या किताबानं गौरवण्यात आलं.
भारताकडून, अजिंक्य रहाणेनं ७३ रन्स करत कोहलीला चांगली साथ दिली. विराट कोहली आणि अजिंक्य रहाणेनं तिसऱ्या विकेटसाठी २१३ रन्सची महत्त्वपूर्ण पार्टनरशिप केली.
दरम्यान, बांग्लादेशनं मुशफिकर रहिमच्या ११७ रन्सच्या जोरावर भारतापुढे २८० रन्सचं टार्गेट ठेवलं होतं. टीम इंडियानं हे टार्गेट चार विकेट्स गमावून पार केलं.
त्याचप्रमाणे या विजायासह भारतीय टीमनं आपली पराभवाची मालिकाही खंडित केली. एशिया कपमध्ये कोहलीच्या टीमसाठी पहिला पेपर हा अतिशय सोपा होता. आता टीम इंडियाचा पुढचा मुकाबला होणार आहे तो बलाढ्य श्रीलंकेच्या टीमशी...
•
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.•
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.
First Published: Wednesday, February 26, 2014, 23:10