Last Updated: Thursday, November 14, 2013, 21:38
www.24taas.com, झी मीडिया, मुंबई बीसीसीआयने सध्या सुरू असलेल्या सीझनकरता कॉन्ट्रॅक्ट करण्यात आलेल्या २५ क्रिकेटर्सची यादी जाहीर केली आहे. सचिन तेंडुलकर, महेंद्रसिंग धोनी, विराट कोहली, आर. अश्विन आणि सुरेश रैना यांचा ‘ग्रुप ए’मध्ये समावेश करण्यात आला आहे.
‘ग्रुप ए’मधील प्लेअर्सना एक कोटी रूपये कॉन्ट्रॅक्टरूपाने मिळणार आहेत तर ‘ग्रुप बी’मधील क्रिकेटर्सना ५० लाख रूपये बीसीसीआयकडून देण्यात येणार आहेत. यात गौतम गंभीर, युवराज सिंग आणि रोहित शर्मासह ११ क्रिकेटर्सचा समावेश आहे तर २५ लाख रूपयांच्या ‘ग्रुप सी’मध्ये दिनेश कार्तिक आणि अजिंक्य रहाणेसह नऊ खेळाडुंना संधी देण्यात आली आहे.
मात्र, या कॉन्ट्रॅक्टमधून वीरेंद्र सेहवाग, झहीर खानसह हरभजन सिंगलाही वगळण्यात आलं आहे. खराब फॉर्ममुळे टीम इंडियातून स्थान गमवावं लागलेल्या या त्रिकुटावर आता कॉन्ट्रॅक्टमधूनही स्थान गमावण्याची नामुष्की ओढावली आहे.
•
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.•
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.
First Published: Thursday, November 14, 2013, 21:38