Last Updated: Sunday, May 26, 2013, 13:43
www.24taas.com, झी मीडिया, चेन्नई आयपीएल स्पॉट फिक्सिंग प्रकरणात चेन्नईचा सीईओ गुरूनाथ मय्यप्पन याचा हात असल्याचे स्पष्ट झाल्याने त्याचे बीसीसीआयने निलंबन केले आहे. दरम्यान, मुंबई पोलिसांनी त्याच्या घरावर चेन्नईत छापा मारला.
फिक्सिंगप्रकरणी अटकेत असलेला भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे अध्यक्ष एन. श्रीनिवासन यांचा जावई गुरूनाथ मुय्यप्पन याच्यावर कडक कारवाई होण्याची शक्यता आहे. फिक्सिंगप्रकणात अधिक काही माहिती हाती मिळते का, यासाठी आज चेन्नईतील घरावर मुंबई पोलिसांच्या पथकाने छापा टाकला. स्पॉट फिक्सिंगप्रकरणात मुय्यप्पनचा हात असल्याच्या संशयावरून पोलिसांनी हा छापा टाकला आहे.
या छाप्यात पोलिसांच्या अनेक महत्त्वाची कागदपत्रे लागल्याचे, सूत्रांकडून सांगण्यात येत आहे. मुंबई पोलिसांनी मय्यप्पनला सट्टेबाजीप्रकरणी शुक्रवारी अटक केली असून, सध्या त्याला २९ मेपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्यात आले आहे. मय्यप्पन याच्यावर बॉलिवूड अभिनेता विंदू दारा सिंग याच्याशी संबंध असल्याच्या आणि संघाच्या रणनितीबाबत सट्टेबाजांना माहिती पुरविल्याचाही आरोप आहे. बीसीसीआयनेही मय्यप्पन याच्यावर क्रिकेटसंबंधी सर्व व्यवहार करण्यास बंदी घातली आहे.
•
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.•
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.
First Published: Sunday, May 26, 2013, 13:43