बिन्नीची दमदार बॉलिंग, मॅचसह सीरिजही टीम इंडियाचीBinny, Sharma guide India to 47-run win over Bangla

बिन्नीची दमदार बॉलिंग, मॅचसह सीरिजही टीम इंडियाची

बिन्नीची दमदार बॉलिंग, मॅचसह सीरिजही टीम इंडियाची
www.24taas.com, झी मीडिया, मीरपूर

बांग्लादेश विरुद्धच्या दुसऱ्या वनडे मॅचमध्ये बॅट्समनच्या खराब कामगिरीमुळं केवळ १०५ धावांवर ऑलआऊट होणाऱ्या टीम इंडियानं स्टुअर्ट बिन्नी याच्या दमदार बॉलिंगच्या जोरावर मॅच खिशात घातलीय. या मॅचसह टीम इंडियानं सीरिजही जिंकलीय.

बिन्नीनं ४ रन्स देत ६ विकेट घेतल्या आणि मोहित शर्मानं २२ रन्स देऊन ४ विकेट घेतल्या. या दोघांच्या बॉलिंगच्या जीवावर मॅचमध्ये जोरदार पुनरागमन करत बांग्लादेशला केवळ ५८ रन्समध्ये भारतानं गुंडाळलं.

भारतासाठी हा विजय ऐतिहासिक आहे कारण की, बांग्लादेश विरुद्ध १०५ हा स्कोअर आजपर्यंतचा सर्वात कमी स्कोअर होता. असं पहिल्यांदाच घडलं आहे की, भारतानं एखाद्या टीम विरुद्ध कमी टार्गेट ठेवूनही मॅच जिंकली. तसंच स्टुअर्ट बिन्नी याची बॉलिंगमधील कामगिरी देखील ऐतिहासिक ठरली. रन्स आणि विकेट यांची सरासरी पाहता हा एक प्रकारचा रेकॉर्डच आहे. या विजयासोबतच तीन वनडे मॅचच्या सीरिजमध्ये भारताने २ मॅच जिंकून सीरिजही खिशात टाकली आहे.


* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Tuesday, June 17, 2014, 21:31


comments powered by Disqus