Last Updated: Sunday, March 31, 2013, 21:15
www.24taas.com, मुंबईIPLच्या मुद्यावर भाजप आक्रमक झाली आहे. राज्यात दुष्काळाची परिस्थीती असताना IPL चे सामने राज्यात अन्यत्र हलवण्याची मागणी विनोद तावडेंनी केली आहे.
मुंबईतल्या वानखेडे आणि पुण्यात आयपीएलच्या मॅचेस होणार आहेत. मात्र दुष्काळाच्य़ा पार्श्वभूमीवर या मॅचेस अन्य जागी खेळवण्यात याव्यात अशी मागणी तावडे यांनी केलीय.. यासाठी त्यांनी यासंदर्भात आयपीएलचे कमिश्नर राजीव शुक्ला यांना पत्रही लिहलंय.
तावडे यांच्या आधी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी राज्यात आयपीएल मॅच खेळवण्याबाबत विरोध दर्शवला होता.. आता तावडे यांनीही अशीच आक्रमक भूमिका घेतल्यानं आयपीएल मॅच होणार का असा प्रश्न उपस्थित झालाय... शिवाय राज्यातले क्रिकेटप्रेमी आयपीएलला मुकणार का याकडं सा-याचं लक्ष लागलंय...
First Published: Sunday, March 31, 2013, 21:15