ब्रँडन मॅक्यूलमवर आयसीसीच्या भ्रष्टाचार विरोधी पथकाची नजर Brandon Mccullam on anti corruption radar

ब्रँडन मॅक्यूलमवर आयसीसीच्या भ्रष्टाचार विरोधी पथकाची नजर

ब्रँडन मॅक्यूलमवर आयसीसीच्या भ्रष्टाचार विरोधी पथकाची नजर
www.24taas.com, झी मीडिया, वेलिंग्टन

सध्या क्रिकेटला फिक्सिंगचे प्रकरण फारचं सतावत आहे. हे फिक्सिंग प्रकरण संपवण्यासाठी आयसीसीने खूप प्रयत्न सुरू केलेत. प्रकरण संपवण्याच्या दिशेने आता आयसीसीची पावलं न्यूझीलंड क्रिकेट संघाचा कर्णधार ब्रँडन मॅक्यूलमकडे वळली आहेत. मॅक्यूलम हा नेहमीच आपल्या धुवाधार बॅटिंगसाठी चर्चेत असतो.

ब्रँडन मॅक्यूलमवर आयसीसीच्या भ्रष्टाचार विरोधी पथकाची नजर पडली आहे. विशेष म्हणजे, या बातमीला न्यूझीलंड क्रिकेट मंडळाने देखील दुजोरा दिलेला आहे. पण मॅक्यूलमचा मात्र फिक्सिंगशी काहीही संबंध नसल्याचा `एनझेडसी`ने सांगितलं आहे.

`एनझेडसी`ने या प्रकरणाबाबत बोलताना सांगितलं की, `मॅक्यूलमवर फिक्सिंगचा कोणत्याही प्रकारे आरोप नाही. खरं तर मॅक्यूलमने आयसीसीला दिलेली साक्ष ही लिक झाली आहे. आम्ही न्यूझीलँड क्रिकेट टीमचा कॅप्टन मॅक्यूलमच्या पाठीशी खंबिरपणे उभे आहोत.

सध्या ब्रँडन मॅक्यूलम हा भारतात सुरू असलेल्या `आयपीएल`मध्ये चेन्नई सुपरकिंग्स टीममध्ये खेळत आहे.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Wednesday, May 21, 2014, 19:43


comments powered by Disqus