ब्रँडन मॅक्यूलमवर आयसीसीच्या भ्रष्टाचार विरोधी पथकाची नजर

Last Updated: Wednesday, May 21, 2014, 19:43

सध्या क्रिकेटला फिक्सिंगचे प्रकरण फारचं सतावत आहे. हे फिक्सिंग प्रकरण संपवण्यासाठी आयसीसीने खूप प्रयत्न सुरू केलेत. प्रकरण संपवण्याच्या दिशेने आता आयसीसीची पावलं न्यूझीलंड क्रिकेट संघाचा कर्णधार ब्रँडन मॅक्यूलमकडे वळली आहेत. मॅक्यूलम हा नेहमीच आपल्या धुवाधार बॅटिंगसाठी चर्चेत असतो.

१५० पोलीस अॅण्टी करप्शनच्या सापळ्यात

Last Updated: Tuesday, May 13, 2014, 19:26

सरकारी विभागातील लाचखोरीला आळा घालण्यासाठी अॅण्टी करप्शन विभागाचे महासंचालक प्रवीण दीक्षित प्रयत्न करीत आहेत. आतापर्यंत महसूल विभागातल्या अधिकाऱ्यांपेक्षा लाचखोर पोलीस पहिल्या स्थानावर आहेत.

त्याने १००० रुपये `खाल्ले`

Last Updated: Wednesday, October 2, 2013, 00:06

एखाद्याने पैसै खाल्ले असे आपण सहज म्हणतो ऐकतो.. पण औरंगाबादच्या संतोष जाधव याने हे प्रत्यक्ष करुन दाखवलय.. 25 हजारांची लाच घेताना हा पठ्ठा रंगेहाथ पकडला गेला आणि पुरावे मिटवण्याच्या नादात त्यानं चक्क 1000 रुपयांची नोटच गिळली.

भुजबळांच्या चौकशीला अखेर गृहखात्याची परवानगी

Last Updated: Tuesday, September 18, 2012, 14:40

नवी दिल्लीतल्या महाराष्ट्र सदनच्या उभारणीत झालेल्या कथित गैरव्यवहारप्रकरणी छगन भुजबळांच्य़ा एसीबीमार्फत चौकशीला गृह खात्यानं मंजूरी दिली आहे. दिल्लीतल्या महाराष्ट्र सदनाच्या उभारणीची कंत्राटं देताना सार्वजनिक बांधकाममंत्री छगन भुजबळ यांनी आपल्या मर्जीतील लोकांना आणि सुनांच्या कंपन्यांना कंत्राटे मिळतील अशी व्यवस्था केल्याचा आरोप भाजप नेते किरीट सोमय्या यांनी केलाय.

भुजबळांच्या चौकशीला सरकारचीच टाळाटाळ

Last Updated: Thursday, September 13, 2012, 18:56

महाराष्ट्र सदन घोटाळाप्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक खात्याने (एसीबी)ने एक धक्कादायक खुलासा केलाय.. राज्य सरकार सार्वजनिक बांधकाममंत्री छगन भुजबळ यांची चौकशी करण्यास टाळाटाळ करत असल्याचं आता समोर आलंय. लाचलुचपत प्रतिबंधक खात्याकडून आलेल्या पत्रातून हा गौप्यस्फोट झालाय.

कृपाशंकर यांचा राजीनामा स्वीकारला!

Last Updated: Wednesday, February 22, 2012, 19:02

बेहिशेबी मालमत्ता प्रकरणी हायकोर्टानं दिलेल्या झटक्यानंतर, कृपाशंकर सिंह यांच्यावर पक्षश्रेष्ठींचीही अवकृपा झालीय. मुंबई मनपा निवडणुकीनंतर मुंबई काँग्रेस अध्यक्षपदाचा दिलेला पक्षश्रेष्ठींनी स्वीकारला आहे. यामुळे कृपाशंकर सिंह यांना आज दुहेरी फटका बसलाय.

कृपाशंकर सिंहांवर भ्रष्टाचाराचा गुन्हा!

Last Updated: Wednesday, February 22, 2012, 16:55

मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष कृपाशंकर सिंह यांच्याविरोधात भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.