टीम इंडिया घोषित, cricket team india

टीम इंडिया घोषित, युवी-जहीरला डच्चू

टीम इंडिया घोषित, युवी-जहीरला डच्चू
www.24taas.com, कोलकाता

चौथ्या आणि शेवटच्या नागपूर कसोटी सामन्यासाठी टीम इंडियाची घोषणा करण्यात आली. टीममधून झहीर खान, युवराज सिंग आणि हरभजन सिंगला डच्चू देण्यात आला आहे. तर टी-२० संघही जाहीर करण्यात आलाय.

१३ डिसेंबर रोजी इंग्लंड विरुद्ध भारत चौथा कसोटी सामना नागपूर येथे आयोजित करण्यात आला आहे. झहीर खानच्या जागी दिल्लीचा वेगवान गोलंदाज परविंदर अवना याला संधी देण्यात आली आहे.

स्थानिक क्रिकेट सामन्यांमध्ये शतकांचे हॅटट्रिक करणाऱ्या सौराष्ट्राच्या रवींद्र जडेजाला संघात स्थान देण्यात आले आहे. हरभजन सिंगची जागा पियुष चावला भरून काढणार आहे.

कसोटी संघ
महेंद्रसिंह धोनी (कर्णधार), गौतम गंभीर, वीरेंद्र सेहवाग, सचिन तेंडुलकर, विराट कोहली, रवींद्र जडेजा, चेतेश्वभर पुजारा, आर. अश्वितन, अशोक दिंडा, प्रग्यान ओझा, अजिंक्य रहाणे, पियुष चावला, ईशांत शर्मा, एम. विजय, परविंदर अवना.

टी-२० संघ
महेंद्रसिंह धोनी (कर्णधार), गौतम गंभीर, सुरेश रैना, रोहीत शर्मा, युवराज सिंग, मनोज तिवारी, आर अश्विन, विराट कोहली, रवींद्र जडेजा, अशोक दिंडा, भुवनेश्वर कुमार, लक्ष्मीपती बालाजी, अजिंक्या रहाणे, पियुष चावला, परविंदर अवना.

First Published: Sunday, December 9, 2012, 14:39


comments powered by Disqus