गंभीर स्वार्थी, टीमचे नुकसान करणारा खेळाडू - धोनी, Dhoni lodges complaint with BCCI against Gambhir

गंभीर स्वार्थी, टीमचे नुकसान करणारा खेळाडू - धोनी

गंभीर स्वार्थी, टीमचे नुकसान करणारा खेळाडू - धोनी
www.24taas.com, मुंबई

गंभीर हा स्वार्थी आणि टीमचे नुकसान करणारा क्रिकेटपटू आहे. तो केवळ टीममधील आपले स्थान कायम राखण्यावर लक्ष केंद्रीत करतो. जर अश्विन रन्स करू शकतो तर गंभीर रन्स का नाही करू शकत. मुंबई टेस्टमध्ये त्याने स्वान आणि पानेसरच्या बॉलिंगचा सामना न करता तळाच्या बॅट्समनना त्यांच्या बॉलिंगचा सामना करायला भाग पाडले. गंभीरच्या हलगर्जीपणामुळे कोलकाता टेस्टमध्ये सेहवाग आणि पुजारा आऊट झाले.

महेंद्रसिंग धोनी आणि वीरेंद्र सेहवाग यांच्यामधील वाद जगजाहीर आहे. मात्र धोनी आणि गंभीरमधील वाद प्रथमच चव्हाट्यावर आला आहे. कॅप्टन धोनी गौतम गंभीरच्या वागणूकीबाबत नाराज असून त्याने याबाबत थेट बीसीसीआयकडेच तक्रार केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.


कॅप्टन महेंद्र सिंग धोनी गौतम गंभीरच्या वागणूकीवर नाराज असून त्याने याबाबत बीसीसीआयकडे तक्रार केल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आली आहे. गंभीर हा स्वार्थी आणि टीमचे नुकसान करणारा खेळाडू आहे. गंभीर हा केवळ टीममधील आपल स्थान वाचवण्यावर लक्ष केंद्रीत करतो असंही धोनीच म्हणणं असून धोनीने त्याच्या कामगिरीवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे.

आता नागपूर टेस्टपूर्वी बीसीसीआयने गंभीरशी चर्चा करून याबाबत तोडगा शोधावा असं धोनीने बीसीसीआयला सुचवलं आहे. दरम्यान गंभीरच्या जवळच्या व्यक्तींनी दोघांमध्ये काहीही मतभेद नसल्याची माहितीही सूंत्राकडून दिली आहे. मात्र गंभीरच्या जवळच्या व्यक्तींनी धोनीवर टीका केल्याचही समजतं. धोनीची कॅप्टन्सी सध्या धोक्यात तर आहेच याशिवाय टीममधील त्याच्या स्थानावरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. म्हणूनच धोनी नेहमीच खराब कामगिरीसाठी दुस-यांना दोषी धरत असल्याचं त्यांच म्हणणं आहे. याशिवाय धोनीच्या कॅप्टन्सीला आव्हान देण्याचे गुण गंभीरमध्ये असल्यानेच धोनी गंभीरबाबत अशाप्रकारे व्यक्तव्य करत असल्याचही गंभीरच्या जवळच्या सूत्रांकडून सांगण्यात आलंय. दरम्यान या वादामध्ये किती तथ्य आहे हे अजूनही गुलदस्त्यातच असलं तरी, टीममध्ये नक्कीच असंतोष असल्याचं या प्रकरणामुळे स्पष्ट झालं आहे.

First Published: Wednesday, December 12, 2012, 15:49


comments powered by Disqus