www.24taas.com, मुंबईइंग्लंडविरूद्ध झालेल्या पराभवानंतर कॅप्टन धोनीने झालेल्या झालेल्या चुका सुधारल्या... आणि ऑस्ट्रेलियाविरूद्ध धोनी एका नव्या अवतारात दिसला... नेहमी शांत दिसणारा धोनी ऑस्ट्रेलियाविरूद्ध आक्रमक रूपात दिसला...त्याची ही आक्रमकता बॅटिंग आणि कॅप्टनसी या दोहोंमध्ये दिसली...
क्रिकेटचा दबंग
ऑस्ट्रेलियाविरूद्ध टेस्ट सीरिजमध्ये सुरूवातीपासून कॅप्टन धोनी नव्या अवतारात दिसला.. त्याने आधीपासूनच ठरवलं होतं की काही झालं तरी ही संधी वाया जाऊ देणार नाही... कॅप्टन धोनीचा आत्मविश्वास आणि विजय साजरा करण्याची इच्छा चेन्नई टेस्टमध्ये त्याच्या बॅटिंगमध्येही दिसून आली... आणि त्याचाच परिपाक म्हणजे धोनीच्या रेकॉर्ड 224 रन्सच्या धडाकेबाज इनिंगमुळे प्रतिस्पर्धी ऑस्ट्रेलियन टीमची बोबडीच वळाली...
इंग्लंडविरूद्ध अपमानजनक पराभवानंतर कॅप्टन कूल धोनीचा अंदाजही बदललेला दिसला..
कॅप्टन कूलची आक्रमकता
नेहमी क्रिकेटच्या मैदानात शांत दिसणारा कॅप्टन धोनी ऑस्ट्रेलियाविरूद्ध आक्रमक होताना दिसला... विजयाच्या समीप येताना तर धोनीचा अंदाज हा फॅन्सकरताही नवीन होता...
क्रिकेटच्या मैदानात वर्ल्ड चॅम्पियन ऑस्ट्रेलियाला लोळवल्यानंतर धोनी ब्रिगेड क्रिकेटचे नवे चॅम्पियन म्हणुन जरी ओळखली जात असली... तरी त्यांची खरी कसोटी अजून बाकी आहे... परदेशी पीचेसवर त्यांना अजून आपला दबदबा सिद्ध करायचा आहे... ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिकेच्या विकेट्सवर नवनवीन विक्रम रचायचे आहेत... धोनीची त्यादृष्टीने तयारीला सुरूवातही झाली असणारच... कारण अशक्य गोष्टी शक्य करण्यात कॅप्टन धोनीचा हात कोणीच धरू शकत नाही...
क्रिकेट हा भारतीयांचा धर्म...क्रिकेट या एका छत्राखाली कोट्यावधी भारतीय सर्व भेदभाव विसरुन एक होतात...पण क्रिकेट हा पूर्वीप्रमाणे फक्त एक खेळ राहिलेला नसून आता त्याचं मोठ्या पातळीवर व्यावसायीकरण झालाय. आणि या व्यवसायाचा धोनी हा लंबी रेस का घोडा आहे हे कॅप्टन कूलनं पुन्हा एकदा दाखवून दिलय.
क्रिकेट हा कोट्यावधी भारतीयांचा एक धर्म....चाहते जितकं प्रेम क्रिकेटवर करतात किंबहूना त्याहीपेक्षा जास्त प्रेम ते क्रिकेटर्सवर करतात...त्या क्रिकेटर्सवर जे या कोट्यावधी चाहत्यांच्या अपेक्षांचं ओझं वाहतात आणि त्यांच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी मैदानात जीवाचं रान करतात...काही क्रिकेटर्संना एखाद्या रात्रीत प्रसिद्धी मिळते ते यशाच्या शिखरावर पोहोचतात आणि जितक्या लवकर ते शिखरावर पोहोचतात तितक्याच लवकर ते खालीही येतात, मात्र काहींचे सितारे बुलंद असतात आणि ते वारंवार आपल्या नावाला साजेशी कामगिरी करत आपली `व्हॅल्यू` फक्त कायमच ठेवत नाहीत तर ती वाढवतातही... असाच एक अफलातून क्रिकेटर म्हणजे टीम इंडियाचा कॅप्टन महेंद्रसिंग धोनी...
धोनी..या एका नावानं भारतीय क्रिकेट अक्षरश: ढवळून निघालय. धोनीच्या नावाचा डंका पंचक्रोशीत वाजतोय... टीम इंडियाला पहिला-वहिला टी-20 वर्ल्डकप, त्यानंतर टेस्टमध्ये अव्वल स्थानी पोहचवण्याचा चमत्कार आणि सर्वात मोठा विजय अर्थात 28 वर्षांनी 2011चा वर्ल्डकप भारताला जिंकून देण्याची किमाया केली ती या कॅप्टन कूल धोनीनं.
अर्थात इतक्या सर्व विक्रमांना गवसणी घातल्यानंतर धोनीची ब्रॅण्ड वॅल्यू वाढणं हे सहाजिकच होतं...आणि तसं झालंही.. धोनी हा फक्त भारतातच नाही तर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये नंबर वन ब्रॅण्ड ठरला. धोनी खो-यानं नाही तर अक्षरश: छप्पर फाडके कमाई करु लागला. अनेक नामांकित कंपन्या त्याच्याकडे धाव घेऊ लागल्या.. एका कंपनीकडून वर्षाला सरासरी 10 कोटी ही त्याची फी...
धोनीच्या ब्रॅण्ड व्हॅल्यूमध्ये दिन दुगनी रात चौगुनी वाढ होऊ लागली.क्रिकेट आणि जाहिरात...जाहिरात आणि क्रिकेट या दोनच गोष्टी तो करताना दिसू लागला...परिसाप्रमाणे धोनीच्या मिडास टचमुळे तो ज्या गोष्टीला हात लावायचा त्याचं सोनं झालं आणि त्याच्या त्याची तशीच किंमतही मिळाली...पण धोनीचा टचही हरपला...वर्ल्डकप विजयानंतर टीम इंडियाला एकही मोठी टेस्ट सीरिज जिंकता आली नाही. टेस्टमध्येही टीमची मोठी पिछेहाट झाली..
एक कॅप्टन म्हणून आणि एक बॅट्समन म्हणूनही माही अपयशी ठरताना दिसला.. त्याच्या परफॉर्मन्सचा फटका त्याच्या मार्केट वॅल्यूलाही झाला...धोनी हटाओ टीम बचाओ अशीही मागणी होऊ लागली...
तब्बल 40 कंपन्याचं ऐण्डोसमेंट करणा-या धोनीवरून निम्यापेक्षा जास्त कंपन्यांनी आपाला हात काढला.....कॅप्टन धोनीचा भाव पुन्हा घसरला...धोनीला आणि टीम इंडियाला एखाद्या संजीवनीचीच गरज होती..आणि मायदेशात ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या या सीरिजमध्ये ती मिळालीही.. चेन्नई धोनीनं टेस्टमध्ये पहिली वहिली डबल सेंच्युरी झळकावली आणि टीम इंडियानं पहिल्या टेस्टमध्ये सुपर विजय मिळवून दिला..त्यानंतर दुस-या टेस्टमध्येही शानदार विजय मिळवत सीरिजमध्ये 2-0नं विजयी आघाडी घेतल्यामुळे धोनीच्या व्हॅल्यूचा आलेख आता पुन्हा चढेल अशी भविष्यवाणी जाणकारांनी केलीय. फक्त जाहिरांतीमधून धोनी वर्षाला 150 ते 200 कोटींची कमाई करतोय आणि आता या सीरिजमधील त्याच्या कामगिरीमुळे या व्हॅल्यूत मोठी वाढ होईल असंही भाकित केलं गेलंय. ज्या कंपन्यांनी धोनीकडे पाठ फिरवली आणि ज्या कंपन्यांशी त्याचा करार रिन्यू होणार आहे त्यांना आता धोनीला आपल्या टीममध्ये घेण्यास जास्त किंमत मोजावी लागेल हेही निश्चित....यावरुनच कॅप्टन महेंद्रसिंग धोनी हा मैदानवर आणि मैदानाबाहेरही लंबी रेसचा घोडा आहे असं म्हंटलं तरी ते चूकीचं ठरणार नाही.....
ऑस्ट्रेलियाविरूद्ध टेस्ट सीरिजपूर्वी धोनी हटाव मोहिमेने जोर धरला होता... मात्र प्रत्यक्षात माही मॅजिकने सीरिजमध्ये अशी काही कमाल केली... की सर्वचजण धोनीचे गुणगाण गायला लागले...
तो आला…त्याने पाहिलं… त्याने जिंकलं.. `क्रिकेटचा दबंग`
मैदानात केवळ माही राज दिसला... सगळीकडे त्याचीच चलती आहे...ऑस्ट्रेलियाविरूद्ध धोनी दबंग मूडमध्ये दिसला... कॅप्टन कूल धोनी मैदानात आक्रमक व्यूहरचना रचत होता आणि कांगारूंना सळो की पळो करून सोडलं.....
हैदराबादमध्ये ऑस्ट्रेलियाविरूद्ध इनिंग आणि 135 रन्सनी मिळवलेला विजय कॅप्टन धोनीला दुहेरी आनंद देणारा ठरला... धोनीने आपल्या नेतृत्वाने केवळ टीमला सीरिजमध्ये 2-0 अशी आघाडीच मिळवून दिली नाही तर... टेस्टचे दादा असणा-या ऑस्ट्रेलियाला चारी मुंड्या चीतही केलं...
कॅप्टन धोनीने भारताचा माजी कॅप्टन सौरव गांगुली मागे टाकत टेस्टमध्ये सर्वाधिक विजय मिळवणारा कॅप्टन बनण्याचा मान पटकावला... धोनीने 22 टेस्ट मॅचेस जिंकल्या आहेत... इतकंच नाही तर भारतात ऑस्ट्रेलियाविरूद्ध धोनीचा विजयाचा टक्का शंभर टक्के आहे...
टेस्टमध्ये 22 विजयांचा रेकॉर्ड
चेन्नईमध्ये धोनी सुपरकिंग ठरला... तर हैदराबादमध्ये कुशल नेतृत्वाच्या जोरावर इनिंगने विजय मिळवून देणारा धोनी सिकंदर झाला... या सीरिजआधी धोनीवर झालेल्या टीकाकारांना धोनीने आपल्या स्टाईलने सडेतोड उत्तर दिलं आहे... त्याचा हा नवीन अंदाज धोनीला क्रिकेटच्या मैदानातील दबंग ठरवतोय...
जगभरातील प्रसिद्ध बिझेनेस, सेलिब्रिटिज, खेळाडूंच्या कमाईची आणि लोकप्रियतेची आकडे जाहीर करणा-या फोर्ब्सच्या लिस्टमध्ये धोनीनं स्थान पटकावलंय..महत्वाचं म्हणजे कमाईमध्ये धोनी भारतातील अव्वल खेळाडू तर ठरलाच शिवाय जगातिल अनेक दिग्गज प्लेअर्सलाही त्यानं मागे टाकलेय.
क्रीडा विश्वातली हे सर्व चेहरे आपापल्या क्षेत्रातील लिजंड ठरले आहेत... ब्रँडच्या विश्वातही यांचाच दबदबा आहे... प्रसिद्धीसह या सर्वांवर पैशांचाही अविरत वर्षाव सुरू आहे... पण तुम्हाला विश्वास बसणार नाही... टीम इंडियाचा कॅप्टन महेंद्र सिंग धोनीपुढे ब्रॅडच्याबाबतीत स्टार्स फारच मागे आहेत....
स्पॉन्सरच्या रेसमध्ये तर धोनीने फुटबॉल विश्वातील सर्वात लोकप्रिय अर्जेंटीनाईन फुटबॉलर लिओनेल मेसीलाही मागे टाकलं आहे...
2012 फोर्ब्स मॅगझीनच्या सर्वात श्रीमंत खेळाडूंच्या लिस्टमध्ये धोनी एक ब्रँड म्हणुन क्रीडा विश्वातील अनेक दिग्गजांपेक्षा वरचढ ठरला आहे... धोनी या लिस्टमध्ये 31व्या स्थानी आहे...
गोल्फ लिजंड टायगर वूड्स, ख्रिस्तियानो रोनाल्डो, राफाएल नादाल आणि डेव्हिड बेकहॅमसारख्या खेळाडूंपेक्षा धोनी जरी मागे असला.. तरी ब्रँड विश्वातील त्याची झेप सर्वांनाच आश्चर्याचा धक्का देणारी ठरली आहे...
मात्र येथे क्रीडा विश्वातील सर्वात मोठ्या ब्रँडचं नाव घेतलं गेलं तर धोनीचा क्रमांक फारच खाली आहे... अमेरिकन गोल्फ प्लेअर टायगर वूड्स ब्रँडच्या जगताचा बेताज बादशाह ठरला आहे... 55 मिनियन यूएस डॉलर्ससह वूड्सची ब्रँड व्हॅल्यू धोनीब्रँडपेक्षा डबल ठरली आहे...
माही सर्वात श्रीमंत भारतीय खेळाडू
एक ब्रँड म्हणुन धोनी जगातील काही महान खेळाडूंपेक्षा जरी मागे असला तरी जगातील सर्वात श्रीमंत 100 खेळाडूंच्या लिस्टमध्ये मात्र धोनीच्या नावाची नोंद आहे... तसंच तो भारताचा सर्वात श्रीमंत खेळाडूही ठरलाय...
ऑस्ट्रेलियाविरूद्ध टेस्ट सीरिजपूर्वी धोनीच्या नेतृत्वावर अनेकांनी प्रश्नचिन्ह निर्माण केलं होतं... शिवाय अनेकांनी तर त्याला टेस्ट टीममधूनही बाहेर बसवा अशी मागणी केली होती... धोनीने या सर्व प्रश्नांना सडेतोड उत्तर मैदानात आपल्या कामगिरीने दिलं... त्याने केवळ नेतृत्वातंच कमाल दाखवली नाही तर बॅटिंगच्या जोरावर कांगारूंना नामोहरमही केलं...
इंग्लंडविरूद्ध त्यांच्याच मायभुमीत व्हाईटवॉश मिळाल्यानंतर धोनी ब्रिगेडला भारतातही टेस्ट सीरिज गमवावी लागली... आणि टेस्ट चॅम्पियन्सचा तोरा मिरवणा-या टीम इंडियाची राहिली सुरली इज्जतही धुळीस मिळाली...
विजय, पराभवाच्या या खेळात झीरोतून हिरो आणि हिरोतून झिरो व्हायला वेळ लागत नाही... याची पूर्ण जाणीव कॅप्टन धोनीला आहे... टीम इंडियाच्या जय-पराजयाची ही दृष्य बराच काळ भारतीय फॅन्सच्या लक्षात राहणारी आहेत...
जे दिग्गज धोनीच्या कॅप्टनशीपवर प्रश्नचिन्ह निर्माण करत होते आता तेच धोनीची स्तुती करताना दिसताय..
असं होणं स्वाभाविक होतं... कारण मैदानात कॅप्टन धोनीने कधी आपल्या नेतृत्व कौशल्याने तर कधी बॅटने प्रतिस्पर्ध्यांची दाणादाण उडवली... अखेरच्या क्षणापर्यंत लढण्याची जिद्द त्याच्यात आहे... आणि म्हणुनच टेस्ट विजयांमध्ये धोनी आतापर्यंतच्या सर्व भारतीय कॅप्टन्सच्या एक पाऊल पुढे आहे...
टेस्टमध्ये भारताचे यशस्वी कॅप्टन्स
कॅप्टन टेस्ट विजय पराभव
महेंद्र सिंग धोनी 45 22
सौरव गांगुली 49 21
मोहम्मद अझहरूद्दीन 47 14
नेहमीप्रमाणे कॅप्टन धोनीने ऑस्ट्रेलियाविरूद्ध मिळवलेल्या विजयाचं श्रेय टीम सहका-यांनाच दिलं आहे...यांत तिळमात्र शंका नाही की मैदानात माही मॅजिक आपली कमाल दाखवत आहे... धोनीच्या जाळ्यात प्रतिस्पर्धी अडकायला लागले आहेत... आणि टीम इंडिया पुन्हा विजयी ट्रॅकवर परतली आहे... धोनीचा दंबगिरी पाहता टीमच्या विजयाचा धडाका भविष्यातही कायम राहणार असंच दिसतंय...
First Published: Thursday, March 7, 2013, 00:02