विराट कोहलीला ट्विटरवर डेनिएलचा लग्नाचा प्रस्ताव, Danielle Wyatt proposes to Virat Kohli on Twitter

विराट कोहलीला ट्विटरवर गोरी डेनिएलचे प्रपोज

विराट कोहलीला ट्विटरवर गोरी डेनिएलचे प्रपोज
www.24taas.com, झी मीडिया, नवी दिल्ली

भारताचा आघाडीचा खेळाडू विराट कोहली सध्या भलताच चर्चेत आहे. कालच त्यांने विराट खेळी केली. आता तो मैदानाबाहेर जाहिरात क्षेत्रात नाव कमवून आहे. त्याने सचिन तेंडुलकर, महेंद्रसिंग धोनीला मागे टाकलेय. आता तर तो मुलींच्या गळ्यातील ताईत झालाय. त्याला लग्नाची मागणी घालण्यात येत आहे. चक्क इंग्लंडच्या गोरीने ट्विटरच प्रपोज केलं.

विराट कोहलीचा मैदानावरील अॅटिट्यूड, भन्नाट परफॉर्मन्स यामुळे जगभरात नावारूपाला आलाय. तरुणांमध्ये विराटची क्रेझ आहेच पण त्याचसोबत आता त्यात तरुणींचा भर पडलाय. कोहलीच्या चाहत्यांमध्ये आता अशाच एका तरुणीची भर पडली आहे. ती चक्क इंग्लंडची गोरी आहे. ही तरुणी खास आहेच. कारण ती क्रिकेटची जाणकार आहे. ही तरुणी म्हणजे इंग्लंडची ऑलराऊंडर प्लेअर डॅनियल वेट. तुम्ही चक्रावला असाल, पण हे खरं आहे.

विराट कोहली काल टीम इंडियाबरोबर सेमी फायनलचा विजयोत्सव साजरा करत होता, त्यावेळी डॅनियल वेटने ट्विट करुन चक्क लग्नाच प्रस्तावच ठेवला. कोहली माझ्याशी लग्न कर! डॅनियलला एका चाहत्याने तात्काळ प्रतिक्रियाही दिली. विराट दुसऱ्याच मुलीच्या प्रेमात आहे. त्यावर तिने असं असू शकत नाही, असे उत्तरही तिने दिले. बघा आता, किती प्रेम आहे ते विराटवर..
विराट कोहलीला ट्विटरवर गोरी डेनिएलचे प्रपोज


विराट हा अभिनेत्री अनुष्का शर्मा हिच्या प्रेमात आहे. ही दोघे श्रीलंका, ऑस्ट्रेलिया येथे एकत्र फिरतानाची छायाचित्र प्रसिद्ध झाली आहेत. दोघांचे चोरी चोरी चुपके गॅटमॅट सुरु आहे. तसेच दोघं लीव्ह इनमध्ये राहत असल्याची बातम्याही आल्यात. मुंबईत विराटच्या घरी अनुष्का रात्रभर होती, असेही सांगितलं जात. आता विराट काय निर्णय घेतो, याकडे लक्ष आहे.


इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Saturday, April 5, 2014, 14:28


comments powered by Disqus