Last Updated: Friday, February 21, 2014, 17:08
www.24taas.com, झी मीडिया, पोर्ट एलिजाबेथदक्षिण आफ्रिकेचा आघाडीचा खेळाडू आणि यष्टीरक्षक अॅबी डिव्हिलियर्स याने अनोखा वर्ल्ड रेकॉर्ड केलाय. त्याने सलग १२ सामन्यांमध्ये ५० धावा केल्यात. असा पराक्रम करणारा तो पहिला खेळाडू आहे.
ऑस्ट्रेलियाबरोबर दुसऱ्या कसोटी सामन्यात ५० धावा ठोकल्या आणि त्याने सलग १२ सामन्यांमध्ये १२ अर्धशतके ठोकलीत. डीन एल्गर (८३) आणि फाफ डु प्लेसिस (५५) यांनी तिसर्या गड्यासाठी शतकी भागीदारी करताना ऑस्ट्रेलियाविरुद्ध दुसर्या कसोटी सामन्यात दक्षिण आफ्रिकेला सुरुवातीच्या धक्क्यातून सावरले.
कर्णधार ग्रॅमी स्मिथ आणि हाशिम आमला यांना सहा षटकांच्या आतच गमावल्यानंतर एल्गर आणि डु प्लेसिस यांनी तिसर्या गड्यासाठी ११२ धावांची भागीदारी करताना दक्षिण आफ्रिकेचा डाव सावरला. डिव्हिलियर्स ७ चौकारांसह ५१ आणि ड्युमिनी २ धावांवर खेळत होते. दक्षिण आफ्रिकेकडून एल्गरने १९३ चेंडूंत ९ चौकार, २ षटकारासह ८३, डु प्लेसीसने ५ चौकार, एका षटकारासह ५५ धावा केल्या. ऑस्ट्रेलियाकडून लियोनने ४७ धावांत २ गडी बाद केले. पहिल्या दिवशी खेळ थांबला तेव्हा दक्षिण आफ्रिकेने ५ बाद २१४ धावा केल्या होत्या. दक्षिण आफ्रिकेने उपाहारापर्यंत २ बाद ६४ धावा केल्या होत्या. त्यानंतर त्याने वेग वाढवताना एका तासात ५९ धावा फटकावल्या.
•
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.•
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.
First Published: Friday, February 21, 2014, 17:03