ब्राझीलमध्ये आजपासून रंगणार फुटबॉलपटूंचा महामेळा

Last Updated: Thursday, June 12, 2014, 08:37

ब्राझीलमध्ये फुटबॉलपटूंचा महामेळा रंगणार आहे. वर्ल्ड कप जिंकण्यासाठी 32 टीम्समध्ये लढत होत आहे. मोस्ट अवेटड असा फुटबॉल वर्ल्ड कप 12 जूनला कीक-स्टार्ट होणार आहे. जगभरातील 32 टीम्समध्ये फुटबॉल वर्ल्ड कपवर आपलं नाव कोरण्यासाठी रेस लागणार आहे. फुटबॉलपटूंचा हा महामेळा फुटबॉलप्रेमींसाठी एक पर्वणीच ठरणार आहे. या वर्ल्ड कपमध्ये कोणत्या ग्रुपमध्ये कोणत्या टीम्सचा समावेश असणार आहे. त्यावर एक नजर.

`आयपीएल`मध्ये रैना करणार `सामन्यांचं शतक` पूर्ण

Last Updated: Saturday, April 12, 2014, 12:48

१६ एप्रिलपासून सुरू होणाऱ्या सातव्या आयपीएलमध्ये चेन्नई सुपर किंग्सचा धडाकेबाज खेळाडू सुरेश रैना एक नवीन रेकॉर्ड कायम करण्याची शक्यता निर्माण झालीय.

आयपीएलचे ६० ते ७० टक्के सामने भारतात

Last Updated: Thursday, March 6, 2014, 15:24

आयपीएल टी २० टुर्नामेंटमधील ६० ते ७० टक्के सामने भारतात होणार आहेत. लोकसभा निवडणुकीच्या तारखांची घोषणा निवडणूक आयोगाने केल्यानंतर, आयपीएएलचे चेअरमन रंजीब बिस्वाल यांनी ही माहिती दिली आहे.

दक्षिण आफ्रिकेच्या डिविलियर्सचा अनोखा वर्ल्ड रेकॉर्ड

Last Updated: Friday, February 21, 2014, 17:08

दक्षिण आफ्रिकेचा आघाडीचा खेळाडू आणि यष्टीरक्षक एबी डिविलियर्स याने अनोखा वर्ल्ड रेकॉर्ड केलाय. त्याने सलग १२ सामन्यांमध्ये ५० धावा केल्यात. असा पराक्रम करणारा तो पहिला खेळाडू आहे.

मुंबई vs बंगळूरू स्कोअरकार्ड

Last Updated: Sunday, April 28, 2013, 07:30

मुंबई इंडियन्सने तगड्या रॉयल चॅलेंजर बंगलोरभोवती फास आवळला. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी घेत मुंबईने 195 धावांचे तगडे आव्हान बंगलोरसमोर उभे केले. त्यानंतर बंगलोरच्या हुकमी फलंदाजांना शॉर्ट डिलिव्हरीज टाकून हैराण केले.. हे सर्व काही मुंबईने आखलेल्या योजनेनुसारच चालले होते आणि बंगलोर संघ त्यात अडकत गेला..आतापर्यंत प्रतिस्पर्धी संघाची दाणादाण उडवणारा बंगलोर संघाचा हुकमी एक्का ख्रिस गेलचे वादळही फेल गेले.. त्यामुळेच 195 धावांचा पाठलाग करताना त्यांच्या नाकी नऊ आले आणि मुंबईने ही लढत 58 धावांनी आरामात जिंकली

आयपीएल : श्रीलंकन खेळाडूंना तामिळनाडूत बंदी

Last Updated: Wednesday, March 27, 2013, 07:31

चेन्नईत खेळल्या जाणा-या आयपील मॅचेसमध्ये श्रीलंकन खेळाडू खेळू शकणार नाहीत. तसचं चेन्नईतल्या मॅचेसमध्ये श्रीलंकन अंपायरही असणार नाहीत. तामिळनाडूच्या मुख्यमंत्री जयललिता यांच्या विरोधानंतर बीसीसीआयनं हा निर्णय घेतलाय.

श्रीलंकन खेळाडूंना आयपीएलमध्ये जयललितांचा विरोध!

Last Updated: Tuesday, March 26, 2013, 17:37

चेन्नईतील आयपीएल सामन्यांमध्ये श्रीलंकन खेळाडू आणि अंपायर सहभाग घेणार असतील तर या ठिकाणी एकही सामना होऊ देणार नाही, अशी कठोर भूमिका तामिळनाडूतील मुख्यमंत्री जयललिता यांनी आज घेतली आहे. त्यामुळे आता तामिळनाडूत आयपीएल सामन्यांवर प्रश्न चिन्ह निर्माण झाल आहे.

पहा नव्या वर्षात टीम इंडिया खेळणार तरी किती?

Last Updated: Thursday, January 3, 2013, 17:17

पहा नव्या वर्षात भारतीय क्रिकेट टीमचा भरगच्च असा कार्यक्रम असणार आहे. त्यामुळे क्रिकेटरसिकांना भारताच्या मॅचचा आनंद लुटता येणार आहे.

पाकला हवाय मॅचच्या उत्पन्नात हिस्सा

Last Updated: Wednesday, July 18, 2012, 13:32

डिसेंबरमध्ये आयोजित केलेली भारत-पाकिस्तान मॅच सीरिज अगोदरच वादात अडकलीय, त्यात आता आणखी भर पडण्याची शक्यता आहे ती मैदानाबाहेरच्या काही मुद्यांमुळे... कारण, या मॅचदरम्यान मिळणाऱ्या उत्पन्नात हिस्सा मिळावा, अशी मागणी आता पीसीबी अर्थात पाकिस्तान क्रिकेट बोर्डानं केलीय.