Last Updated: Friday, June 14, 2013, 14:34
www.24taas.com, झी मीडिया, मुंबईसध्या प्रचंड फॉर्ममध्ये असलेला आणि चॅम्पियन्स ट्रॉफीत भारताकडून दमदार कामगिरी करणारा शिखर धवन काही दिवसांपूर्वी फार दु:खी होता. ‘आपल्याआधी आपल्याला ज्युनियर असणाऱ्या विराट कोहलीची संघात निवड होते आणि माझी नाही’ या गोष्टीने तो खूप निराश झाला होता.
२००३-०४ च्या अंडर १९ वर्ल्डकपमध्ये धवन पहिल्यांदा प्रकाशझोतात आला. त्यावेळी त्यानं ‘प्लेअर ऑफ टूर्नामेंट’चा पुरस्कारही पटकावला होता. मात्र, त्याच्यानंतर आलेल्या विराट कोहलीची मात्र त्याच्याआधीच टीम इंडियामध्ये वर्णी लागली. चांगला खेळ करूनही त्याला इंडियन टीममध्ये जागा मिळत नव्हती, यामुळे धवन निराश झाला होता, अशी माहिती धवनचे प्रशिक्षक तारकासिंग उघड केलीय.
‘टीम इंडियामध्ये निवड होत नसल्यामुळे शिखर दु:खी झाला होता. त्याला या गोष्टीचं फार दडपण आलं होत. ज्यावेळी विराट कोहालीची इंडियन टीममध्ये निवड झाली तेव्हा तो अतिशय निराश झाला होता. बऱ्याच वेळेला त्याची संधी हुकली होती. या गोष्टीमुळे त्याने क्रिकेट सोडण्याचाही विचार केला होता’ असं तारकासिंग यांनी एका वर्तमानपत्राशी बोलताना म्हटलंय.
First Published: Friday, June 14, 2013, 14:34