धनाढ्य `कुबेर` धोनीने `माते`ला नाही दिला एकही रूपया, Dhoni don`t give money to temple

धनाढ्य `कुबेर` धोनीने `माते`ला नाही दिला एकही रूपया

धनाढ्य `कुबेर` धोनीने `माते`ला नाही दिला एकही रूपया
www.24taas.com, रांची

भारतीय क्रिकेटचा कॅप्टन महेंद्रसिंग धोनी हा सध्या पैशांच्याबाबतीत `कुबेर`च म्हणावा लागेल.. मात्र याच कुबेराने झारखंडमधील प्रसिद्ध देवडी देवीच्या मंदिरात एकही रूपया दान न केल्याने तेथील संचालन समितीही नाराज झालेली आहे. त्याने त्याच्या ताबडतोब कमाईने सचिन तेंडुलकरलाही मागे टाकले. मात्र धोनीने या मंदिराच्या जीर्णोध्दारासाठी काहीही मदत केली नसल्याने तेथील लोक नाराज झाले आहेत.

यशाचं शिखर गाठण्यापूर्वी रांचीच्या या मंदिरात पूजा करण्यासाठी धोनी नेहमीच येत असे. धोनीने २०११मध्ये विश्वकप जिंकण्यासाठी येथील मंदिराता नवसही केला होता. तसेच २००९मध्ये आपलं आतंरराष्ट्रीय क्रिकेटची करिअर पूर्ण झाल्याबद्दल विशेष पूजाही केली होती.

मंदिर जीर्णोध्दार समितीचे अध्यक्ष मनोज पंडा यांनी पत्रकारांना सांगितले की, धोनीने आर्थिक मदत करण्याचं वचन दिलं होतं. मात्र आतापर्यंत त्याने अजूनपर्यंत तरीही त्याने अशी कोणतीच मदत केलेली नाही. मात्र त्यांना आशा आहे की, देवीवर गाढ श्रद्धा असणारा धोनी नक्कीच मदत करेल.

First Published: Tuesday, January 22, 2013, 16:11


comments powered by Disqus