Last Updated: Monday, May 5, 2014, 20:19
www.24taas.com, वृत्तसंस्था, रांचीगुजरातची दाल-बाटी, महाराष्ट्रात ज्याला बट्टी किंवा पानगे म्हणतात तो पदार्थ विदेशी क्रिकेटर्सनी चांगलाच चाखला. गेल्या गुरूवारी टीम इंडियाचा आणि आयपीएलच्या चेन्नई सुपर किंग्जचा कॅप्टन महेंद्र सिंग धोनीनं आपल्या घरी ‘शौर्य’ रांचीला पार्टी दिली. या पार्टीत चेन्नई सुपर किंग्जचे त्याचे टीम मेट्स होते.
या पार्टीत सुपरहिट ठरली ती डिश म्हणजे लिट्टी चोखा म्हणजे बट्टी म्हणजेच पानगे... एका इंग्रजी वृत्तपत्रानं दिलेल्या माहितीनुसार पार्टीत आलेल्या सर्व परदेशी खेळाडूंनी या डिशवर ताव मारला.
गुरुवारी 1 मेला धोनीचा टीम मेट खेळाडू फाफ डू प्लेसिसच्या पत्नीचा वाढदिवस होता. यानिमित्त धोनीनं आपल्या घरी पार्टीचं आयोजन केलं. पार्टीमध्ये चेन्नई सुपरकिंग्जचे खेळाडू आणि टीम मॅनेजमेंटमधील लोकं होते.
पार्टीच्या स्वयंपाकीनं सांगितलं की, सर्व परदेशी खेळाडूंना लिट्टी चोखा खूप आवडला. धोनी स्वत: सर्वांना या पदार्थाची माहिती देत होता. जेव्हा धोनीनं लिट्टी चोखा बनवण्याची कृती सांगितली तेव्हा टीमचे कोच स्टीफन फ्लेमिंग खूप लक्ष देवून ऐकत होते.
पार्टीचा मेन्यू खूप लांबलचक होता पण डू प्लेसिस, ब्रॅडन मॅक्कलम, ड्वेन स्मिथ आणि जॉन हेस्टिंग्सचं लक्ष लिट्टी चोखावर होतं. तर आर. अश्विनंही या घरगुती डिशचा खूप आनंद घेतलाय
*
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.*
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.
First Published: Monday, May 5, 2014, 20:19