Last Updated: Tuesday, February 11, 2014, 11:12
www.24taas.com, झी मीडिया, नवी दिल्लीगुरुनाथ मयप्पन स्पॉट फिक्सिंगमध्ये दोषी असल्याचा रिपोर्ट मुदगल समितीनं दिला असतानाच आयपीएल सट्टेबाजी आणि स्पॉट फिक्सिंगमध्ये सहा भारतीय प्लेअर्सचा सहभाग असल्याचा उल्लेखही मुदगल समितीच्या रिपोर्टमध्ये कऱण्यात आलाय.
या फिक्सिंगमध्ये कॅप्टन महेंद्रसिंग धोनी यानं गुरुनाथ मयप्पन याला पाठिशी घातल्याचही मुदगल कमिटीच्या रिपोर्टमध्ये म्हटलं असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. त्यामुळे भारतीय क्रिकेटविश्व पुन्हा एकदा हादरून गेलंय.
एका पत्रकाराकडे असलेल्या टेप्समध्ये बुकी आणि प्लेअर्समधला संवाद आहे. मात्र रिपोर्टमध्ये फिक्सिंगमध्ये कोणकोणत खेळाडू आहेत हे अजून स्पष्ट केलेलं नाही.फिक्सिंगमधील एक एक खेळाडू सध्याच्या भारतीय टीमचा सदस्य आहे.तर प्लेअर वर्ल्ड कपमध्येही खेळलेला असल्याचही रिपोर्टमध्ये म्हटलंय.
•
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.•
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.
First Published: Tuesday, February 11, 2014, 11:12