बुकीचा खुलासा, धौनी आणि रैना फिक्सिंगमध्ये सहभागी, bookie disclosed, Dhoni and Raina fixing!

बुकीचा खुलासा, धौनी आणि रैना फिक्सिंगमध्ये सहभागी

बुकीचा खुलासा, धौनी आणि रैना फिक्सिंगमध्ये सहभागी
www.24taas.com, झी मीडिया, नवी दिल्ली

आयपीएल स्पॉट फिक्सिंगबाबत आता नवा खुलासा बुकींकडून करण्यात आलाय. त्यामुळे भारताचा कर्णधार महेंद्रसिंग धोनी आणि आघाडीचा खेळाडू सुरेश रैना अडचणीत आले आहेत. या दोन्ही खेळाडूंचे नाव फिक्सिंग घेतले जात आहे.

तपास यंत्रणामध्ये उत्तम सिंग नावाच्या चौकशीमध्ये धोनी आणि रैना यांची नावे पुढे आली आहेत. मात्र, या दोन्ही खेळाडूंबाबत भारतीय क्रिकेट मंडळाची प्रतिक्रियाची प्रतिक्षा आहे. धोनीने गुरुनाथ मयप्पनला पाठिशी घातले होते. मयप्पन टीमचा आत्मविश्वास वाढविण्यासाठी येत होते. त्यांचा टीमशी काहीही संबंध नव्हता. त्यांची टीमबाबत कोणतीही भूमिका नव्हती, असा दावा धोनीने केला होता.

दरम्यान, स्पॉट फिक्सिंगच्या खुलाशानंतर अभिनेता बिंदू दारासिंग याचेही नाव पुढे आले होते. त्यानंतर वाद-विवाद पुढे आला. चेन्नई सुपरकिंग्ज आणि इंडिया सिमेट्सचे मालक श्रीनिवासन यांनी आपला जावाई मयप्पन याच्या वादापासून स्वत:ला बाजुला ठेवले होते. मात्र, असे असले तरी महेंद्रसिंग धोनी हा कंपनीच्या प्रमुख पदावर आहे. आणि तो चेन्नई सुपरकिंग्ज टीमचा कर्णधारही आहे. त्यामुळे धोनीकडे फिक्सिंगबाबत बोट दाखविले जात आहे.


इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Tuesday, February 11, 2014, 13:41


comments powered by Disqus