Last Updated: Saturday, January 12, 2013, 10:13
www.24raas.com, मुंबई ‘अर्जुनला मनमोकळेपणानं खेळू द्या. त्याच्याकडे फक्त सचिनचा मुलगा म्हणून पाहू नका’, असं आवाहन सचिन तेंडुलकरनं आपल्या चाहत्यांना केलंय.
नुकतीच, अर्जुन तेंडुलकरनं आपल्या वडिलांच्या पावलावर पाऊल टाकत मुंबई ‘अंडर फोर्टीन’च्या टीममध्ये एन्ट्री मिळवलीय... स्थानिक स्पर्धेत १२४ धावांच्या खेळीवर अर्जुन तेंडुलकरने या संघात जागा मिळवली. याबद्दलच सचिन बोलत होता. यावेळी, आत्तापासूनच अर्जुनवर दबाव येऊ नये याची तो काळजी घेतोय. इतर खेळाडूंप्रमाणेच अर्जुनलाही वागणूक दिली जावी, त्याच्यावर फक्त ‘सचिनचा मुलगा’असा शिक्का मारू नये, असं त्याला मनापासून वाटतंय.
‘अर्जुनची संघात निवड झाली. यासाठी त्याचा पिता म्हणून मला खूप आनंद झाला आहे. पण त्याला मनमोकळे खेळू द्या… अर्जुन सध्या खूप मेहनत घेतोय आणि त्याचा फायदा संघ निवडीसाठी त्याला झाला. लोकांनी त्याला सामान्य वागणूक देऊन क्रिकेटचा आनंद घेऊ द्यावा. त्याला कोणत्याही प्रकारची विशेष वागणूक मिळणार नाही याची दक्षता सगळ्यांनीच घ्यायला हवी’ असं आवाहन सचिननं केलंय.
First Published: Saturday, January 12, 2013, 10:13