Last Updated: Friday, January 11, 2013, 10:45
www.24taas.com, मुंबई
मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने कार विकत घेण्याबाबत त्याची पत्नी अंजलीशी खोटं बोलला होता. तेंडुलकरने सांगितले की, एकदा कार खरेदी करण्याचा निर्णय झाल्यानंतर तो अंजलीशी त्या कारचे कौतुक करताना बरेच खोटे बोलला होता.
त्याने सांगितले की, ही चार डोअर असणारी परिवारासाठी अशी कार आहे. मी एम ५ (बीएमडब्ल्यू एम ५) बाबत बोलत आहे. मी तिला सांगितले की, ही जास्त जोरात नाही पळत. मुलं याचा भरपूर आनंद लुटू शकतील, याच्या मागील भागात दोन स्क्रीन आहे. आणि त्यांना जे काही हवं ते पाहू शकतात. मी त्यांना खरंतर ५०० बीएचपीबाबत सांगितलचं नव्हतं.
मोटरस्पोर्ट्सच्या शौकीन असणारा तेंडुलकर म्हणतो की, एकदा एफ वन रेसच्या पहिले त्याला रात्री झोप येत नव्हती. मी कारबाबत मात्र चांगलीच माहिती ठेवून असतो. तसेच मी ऑटो कार्यक्रम आणि एफवन रेस देखील न चुकता पाहत असतो. आणि चांगल्या कार मला नेहमीच खुणावत असतात. त्यामुळे त्या कारची माहिती मिळविण्याचा प्रयत्न करीत असतो.
First Published: Friday, January 11, 2013, 10:41