Last Updated: Thursday, September 12, 2013, 21:10
www.24taas.com, झी मीडिया, इस्लामाबादपाकिस्तानी क्रिकेट बोर्डानं भारताच्या मागे पळू नये, असं पाकिस्तानचा माजी वेगवान बॉलर शोएब अख्तरनं म्हटलं आहे.
भारतात पुढील आठवड्यापासून सुरू होणा-या चॅंपियन्स लीग ट्वेंटी-20 क्रिकेट टीमसाठी फैसलाबाद व्होल्व्होस या पाकिस्तानी टीमला भारताने व्हिसा नाकारला आहे, या पार्श्वदभूमीवर अख्तरने वक्तव्य केलं आहे. शोएब म्हणाला, पाकिस्तानी टीमला भारतानं व्हिसा नाकारल्याचे मला विशेष असे काही वाटत नाही.
दोन्ही देशांमध्ये अद्याप सलोख्याचे संबंध निर्माण झालेले नाहीत. असे असताना भारतीय क्रिकेट बोर्डाकडून आपण अपेक्षा का ठेवायची? असा सवाल शोएब अख्तरने केला आहे.
*
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.*
झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.
First Published: Thursday, September 12, 2013, 21:10