17 वर्षीय मुलीसोबत लग्नाची बातमी शोएबनं नाकारली

Last Updated: Sunday, June 8, 2014, 09:22

रावळपिंडी एक्स्प्रेस म्हणून लोकप्रिय असणारा पाकिस्तानचा माजी गोलंदाज शोएब अख्तरनं आपण 17 वर्षीय मुलीशी विवाह करणार नसल्याचं स्पष्ट केलंय. द एक्सप्रेस ट्रॅब्युन (The Express Tribune ) या पाकिस्तानी वृत्तपत्रानं दिलेल्या बातमीनुसार शोएब अख्तर येत्या 22 जूनला रावळपिंडी इथं 17 वर्षीय रुबाब खानसोबत निकाह करणार आहे. मात्र ट्विट करून शोएबनं हे वृत्त म्हणजे अफवा असल्याचं म्हटलंय.

... आणि शोएब सचिनला घाबरला!

Last Updated: Sunday, November 24, 2013, 18:19

सचिन तेंडुलकर माझ्या गोलंदाजीला घाबरतो, असं विधान करणाऱ्या ‘रावळपिंडी एक्स्प्रेस’ शोएब अख्तरला तोंडावर पाडलंय पाकिस्तानच्याच एका माजी कर्णधारानं... वसीम अक्रमनं.

भारताच्या मागे पळू नका- शोएब अख्तर

Last Updated: Thursday, September 12, 2013, 21:10

पाकिस्तानी क्रिकेट बोर्डानं भारताच्या मागे पळू नये, असं पाकिस्तानचा माजी वेगवान बॉलर शोएब अख्तरनं म्हटलं आहे.

`फिक्सिंग आमची संस्कृती`, अख्तरने काढली पाकची लक्तरं

Last Updated: Monday, October 8, 2012, 06:59

क्रिकेटमध्ये फिक्सिंग करणं ही पाकिस्तानची संस्कृती असल्याचं धक्कादायक विधान पाकिस्तानी बॉलर शोएब अख्तरने केलंय. त्याच्या या वक्तव्यामुळे पाकिस्तानची क्रिकेट टीम चांगलीच अडचणीत येण्याची शक्यता आहे.

शोएबला शिरायचंय कोचच्या भूमिकेत

Last Updated: Saturday, August 18, 2012, 08:08

पाकिस्तानचा सुपरफास्ट बॉलर शोएब अख्तरनं आपल्या राष्ट्रीय क्रिकेट अकादमीत परत यायचंय. पण, यावेळी त्याला खेळाडू म्हणून नाही तर बॉलिंग प्रशिक्षकाची भूमिका निभावण्याची इच्छा आहे.

शोएबसमोर थरथरायचे सचिनचे पाय - आफ्रिदी

Last Updated: Sunday, October 9, 2011, 14:27

शोएबचा चेंडू खेळताना सचिनचे पाय लटपटत असल्याचं मी पाहिलंय, असा दावा करत आफ्रिदीनं आपल्या मित्रासाठी ‘ बॅटिंग ’ केलेय. पण, सचिनबद्दल काहीतरी बोलून प्रसिद्धी मिळवण्याचा हा केविलवाणा प्रयत्न असल्याची प्रतिक्रिया क्रिकेटवर्तुळात व्यक्त होतेय.