Last Updated: Saturday, March 15, 2014, 11:18
www.24taas.com, झी मीडिया, मुंबई टीम इंडियाच्या खराब कामगिरीमुळे कोच डंकन फ्लेचर हटाव मोहिमेला वेग आला आहे. या पार्श्वभूमीवर सुनील गावसकर यांनी फ्लेचर यांची हकालपट्टी करून राहुल द्रविड याला भारताचा कोच म्हणून नियुक्त करण्याचा सल्लाही `बीसीसीआय`ला दिलाय. मात्र, टीम इंडियाचा कोच म्हणून काम करण्यासाठी द्रविड फारसा उत्सुक नाही.
डंकन फ्लेचर यांची जागा घेण्यासाठी राहुल द्रविड अजून तयार नाही. या प्रस्तावाला पूर्णत: धुडकावून लावलं नसलं तरी सध्या वेळ नसल्याचं कारण सांगत राहुलनं सध्यातरी कोच पदापासून यापासून लांब राहणंच पसंत केलंय.
`गावसकर यांनी मी या पदासाठी योग्य असल्याचं सांगितलं, याबद्दल मला आनंदच आहे... पण, या कामासाठी वर्षातील जवळजवळ ११ महिने द्यावे लागतील. मी काही दिवसांपूर्वीच क्रिकेटमधून निवृत्ती घेतलीय. त्यामुळे वेळेच्या अभावामुळे मी या प्रस्तावाला स्वीकार करू शकणार नाही` असं द्रविडनं म्हटलंय. पण, नेमकं भविष्यात काय होईल, कुणी सांगावं...
मी यंदाच्या आयपीएल सत्रात राजस्थान रॉयल्ससाठी वेगळ्या पद्धतीनं मेंटरची भूमिका निभावण्याचा प्रयत्न करेन, असं राहुल द्रविड यानं म्हटलंय.
व्हिडिओ पाहा - •
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.•
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.
First Published: Saturday, March 15, 2014, 10:25