Last Updated: Thursday, April 11, 2013, 20:58
www.24taas.com, बंगळुरूआज आयपीएल मॅचदरम्यान विराट कोहली आणि गौतम गंभीर यांच्यात भांडण जुंपलं. विराट कोहली आऊट झाल्यावर दोघांमध्ये वाद झाला. मात्र इतरांनी दोघांना अडवून वेळीच वाद आवरला.
बंगळुरूचा कॅप्टन असणारा विराट कोहली ३५ रन्सवर आऊट झाला. यावर कोलकाता नाइट रायडर्सच्या टीमने आनंदाने जल्लोष केला. आऊट झाल्यावर कोहली पॅव्हेलियन कडे जात होता. मात्र अचानक तो थांबला आणि आक्रमक होत कलकत्त्याचा कॅप्टन गौतम गंभीरकडे येऊ लागला.गंभीरही आक्रमक होत विराट कोहलीला भिडण्यास निघाला होता. मात्र कोलकात्याचा खेळाडू रजत भाटिया याने मध्ये पडून दोघांना अडवलं. अंपायरही दोघांच्या मध्ये पडून त्यांना रोखण्यासाठी धावले.
कोहली बंगळुरूचा तर गंभीर कोलकाता नाइट रायडर्सचा कॅप्टन आहे. या सामन्यात क्रिस गेलने जोरदार बॅटिंग करत बंगळुरूला विजय मिळवून दिला.
First Published: Thursday, April 11, 2013, 20:58