Last Updated: Monday, February 11, 2013, 17:45
www.24taas.com, मुंबईऑस्ट्रेलिया विरुद्ध होणाऱ्या कसोटी मालिकेत बॉलिंग करण्यासाठी फिरकी गोलंदाज हरभजन सिंग आतुर आहे. ऑस्ट्रेलिया संघाविरुद्ध बॉलिंग करायला आपल्याला आवडते आणि त्यासाठी आपण उत्सुक असल्याचं हरभजन सिंगने म्टलं.
३२ वर्षीय हरभजन सिंग याने अत्तापर्यंत ९९ कसोटी सामन्यांमध्ये ४०८ विकेट्स घेण्याची भरघोस कामगिरी केली आहे. त्यामुळेच २२ फेब्रुवारीपासून सुरु होणाऱ्या भारत-ऑस्ट्रोलिया मालिकेसाठी निवडलेल्या १५ खेळाडूंमध्ये त्य़ाचा सामावेश करण्यात आला आहे.
हरभजनसाठी ही एक मोठी आनंदाची गोष्ट आहे. कारण शेष भारतासाठी मोठी खेळताना रणजी चैम्पियन मुंबई च्या विरुद्ध खेळताना इराणी ट्रॉफी मिळवून दिली. सामन्यानंतर बोलताना हरभजन सिंगने संघात निवड झाल्याबद्दल समाधान व्यक्त केलं. या प्रसंगी बोलताना हरभजन म्हणाला, की मी आज खूप खूश आहे. आणि. हा सामनाही माझ्यासाठी खूप महत्वाचा होता. मी चांगली गोलंदाजी केली आणि त्यामुळेच मला माझा आवडीच्या संघाबरोबर खेळण्याची संधी मिळाली आहे. मी या मालीकेसाठी तयार असल्याचे त्याने सांगितले.
हरभजनने इराणी ट्रॉफिसाठी चांगली कामगीरी करताना ५ विकेट्स घेतल्या. या फिरकी गोलंदाजाने २००१ मध्ये झालेल्या ऑस्ट्रेलियाच्या मालिकेदरम्यान ३२ विकेट्स घेण्याची भरघोस कामगिरी केली होती. सहाजिकच त्यामुळे हरभजचा आत्मविश्वास वाढला आहे.
First Published: Monday, February 11, 2013, 17:45