Last Updated: Sunday, February 10, 2013, 15:04
www.24taas.com, मुंबईभारत विरुद्ध ऑस्टेलिया टेस्ट सिरिज याच महिन्यात सुरू होत आहे. टेस्ट सिरिजसाठी टीम इंडियाची घोषणा करण्यात आलीय. टीममधून युवराज सिंग, रोहीत शर्मा, गौतम गंभीरला डच्चूला देण्यात आलाय.
टीममध्ये नव्याने शिखर धवनला संधी देण्यात आली आहे. टीम इंडियातून गौतम गंभीरला डच्चू देताना हरभजन सिंगला इन करण्यात आलेय. भज्जीचे कमबॅक टीम इंडियाची जमेची बाजू आहे. २२ फेब्रुवारीपासून ऑस्टेलिया टेस्ट सिरिजला सुरूवात होत आहे.
टीममध्ये सचिन तेंडुलकर, महेंद्रसिंग धोनी, विराट कोहली , वीरेंद्र सेहवाग, भुवनेश्वर कुमार, हरभजन सिंग, प्रग्यान ओझा, चेतश्वर पुजारा, अशोक दींडा, आर अश्विन, शिखर धवन, अजिंक्य रहाणे, मुरली विजय, ईशान शर्मा, रवींद्र जडेजा यांचा समावेश आहे.
First Published: Sunday, February 10, 2013, 14:13