Last Updated: Friday, April 12, 2013, 15:48
www.24taas.com, मुंबई आयपीएल... क्रिकेटच्या इतिहासात थोड्याच काळात जरा जास्तच मोठा झालेला खेळ ठरलाय. याचं कारण म्हणजे अनेक देशांतील खेळाडू एकत्र टीम म्हणून खेळताना पहिल्यांदा इथंच दिसले. आपल्याच देशातील एका खेळाडूच्या विरुद्ध खेळणारा दुसरा खेळाडूही, त्यांची बाचाबाचीही इथंच दिसली... पण, यामुळे काही गंमती जंमतीही पाहायला मिळाल्यात... आणि खेळाडू या संधीचा चांगला फायदा घेतानाही दिसत आहेत...
उदारहण म्हणताय... तर, आपल्या इरफान पठाणचंच पाहा ना... इरफान सध्या आपल्या टीममधल्या परदेशी खेळाडूंना हिंदीचे धडे देतोय... दिल्ली डेअरडेव्हिल्स या संघातील परदेशी खेळाडूही मोडक्या तोडक्या हिंदीत म्हणतायत, मुझे इंडिया के लडके ‘लकडियों’ से ज्यादा पसंद है... दीपिका मै तुमसे प्यार करता हूँ... मुझे मुन्नी की जवानी मे मुझे शिला की जवानी दिखती है...
इंग्राजाळलेल्या भाषेत हिंदी... ऊSSSSSफ... पण, खेळाडूंची अशीच धम्माल मस्ती आयपीएलच्या माध्यमामुळे पाहायला मिळतेय... ही धम्माल मस्ती पाहायची असेल तर चला इरफान गुरुजींच्या शाळेत...
व्हि़डिओ पाहा : सौजन्य - यू ट्यूब
First Published: Friday, April 12, 2013, 11:14