ऑस्ट्रेललियाविरूध्द कोहली, धोनीची शतके, india, australia, test match

ऑस्ट्रेललियाविरूध्द कोहली, धोनीची शतके

ऑस्ट्रेललियाविरूध्द कोहली, धोनीची शतके
www.24taas.com, चेन्नई

ऑस्ट्रेलियाविरूध्द खेळताना तिसऱ्या दिवशी मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर आऊट झाल्यानंतर विरोट कोहली आणि कर्णधार महेंद्रसिंग धोनीने शानदात शतके झळकावलीत.

विराट कोहली (१०७), सचिन तेंडुलकर (८१) आणि कर्णधार महेंद्रसिंग धोनीने शतक पूर्ण केले असून सात गड्यांच्या बदल्यात टीम इंडियाने ऑस्ट्रे लियाचे ३८० धावांचे आव्हान १०८.२ षटकात पूर्ण केले.

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात तिस-या दिवशी मास्ट र ब्ला स्टवर सचिन तेंडूलकर बाद झाल्याेनंतर मैदानात उतरलेल्या कर्णधार महेंद्रसिंग धोनी आणि विराट कोहली या जोडीने भारताचा डाव सावरला. कोहलीने १९९ चेंडूत १०२ धावा केल्या. तर महेंद्रसिंग धोनीने सहावे शतक झळकावले. तो १२१ रन्सवर खेळत आहे.

सावध सुरूवात करणा-या सचिन तेंडुलकरला कसोटी कारकिर्दीतील ५२ वे शतक पूर्ण करता आले नाही. टीम इंडियाचा डाव सचिन तेंडुलकर आणि विराट कोहली या जोडीने सावरला. दोघांच्या अर्धशतकाच्या जोरावर भारताने आज रविवारी ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यातील तिसऱ्या दिवशी लंचपर्यंत ४ बाद २६३ रन्स केल्या.

सचिन तेंडुलकरने चांगली फलंदाजी केली. त्याला साथ दिली ती विराट कोहलीने. मात्र, ही जोडी मैदानात चांगला खेळ करत असताना सचिन तेंडुलकर विचित्र पद्धतीने आऊट झाला. नॅथन लिऑनच्या गोलंदाजीवर फटका मारताना बॅटची कडा घेऊन बॉल स्टंपवर आदळला आणि सचिन बोल्ड झाला. त्यानंतर कोहली आणि धोनीने डाव सावरत धावसंख्या अडीचशेच्या पार नेली.

First Published: Sunday, February 24, 2013, 15:26


comments powered by Disqus