टीम इंडियाची ऑस्ट्रेलियाविरुद्ध 135 रन्सची आघाडी Dhoni slams double ton; India 515/8 on Day 3

टीम इंडियाची ऑस्ट्रेलियाविरुद्ध 135 रन्सची आघाडी

टीम इंडियाची ऑस्ट्रेलियाविरुद्ध 135 रन्सची आघाडी
www.24taas.com, चेन्नई

चेन्नई टेस्टच्या तिसऱ्या दिवसअखेर टीम इंडियाने ऑस्ट्रेलियाविरुद्ध 135 रन्सची आघाडी घेतली आहे. दिवसअखेर टीम इंडियाने 8 विकेट्स गमावत 515 रन्स केल्या आहेत.

कॅप्टन महेंद्र सिंग धोनी 206 तर भुवनेश्वर कुमार 16 रन्सवर नॉट आऊट आहे. मास्टर-ब्लास्टर सचिन तेंडुलकर 81 रन्सवर दुर्दैवीरित्या आऊट झाला. यानंतर विराट कोहलीने त्याच्या करियरमधील शानदार चौथी सेंच्युरी झळकावली. यानंतर धोनीने डबल धमाका केला. धोनीने ऑस्ट्रेलियाविरुद्ध कॅप्टन इनिंग खेळताना डबल सेंच्युरी झळकावली. डबल सेंच्युरी झळकावणारा धोनी पहिला भारतीय विकेटकिपर ठरलाय.

तर तिस-या दिवशी ऑस्ट्रेलियाकडून नॅथन लियॉनने तीन तर जेम्स पॅटिन्सन आणि मोईसेस हेन्रिक्सने प्रत्येकी एक विकेट घेतली.

First Published: Sunday, February 24, 2013, 17:47


comments powered by Disqus