टीव्हीवर नाही दिसणार भारत-बांग्लादेश वनडे सीरिज,India - Bangladesh will not telecast on TV

टीव्हीवर नाही दिसणार भारत-बांग्लादेश वनडे सीरिज

टीव्हीवर नाही दिसणार भारत-बांग्लादेश वनडे सीरिज
www.24taas.com, पीटीआय, नवी दिल्ली

येत्या 15 जूनपासून भारत-बांग्लादेशमध्ये होणारी तीन दिवसीय वनडे सिरीज टीव्हीवर प्रसारित होणार नाहीय. या मॅच प्रसारित करण्याचे अधिकार खरेदी करण्यासाठी कोणतेही भारतीय प्रसारक रस दाखवत नाहीयेत.

क्रिकेट वेबसाईट ईएसपीएन- क्रिक इंफोच्या अहवालानूसार, भारतीय प्रसारकामुळे भारत-बांग्लादेशमधील क्रिकेट मॅच टीव्हीवर पाहायला मिळणार नाहीय. तसेच द-मिररच्या अहवालानूसार, बांग्लादेशातील गाझी टीव्ही (ज्याच्याकडे बांग्लादेशमध्ये क्रिकेटचा अधिकार) स्टार स्पोर्टस् आणि सोनी मिक्सला प्रसारणासंबंधित संपर्क केला होता.

स्टार स्पोर्ट्सनी तीन मॅचसाठी 10 लाख (पाच करोड रुपये) डॉलरहून कमी ऑफर केली आहे, जी प्रसारकांनी खूप कमी असल्याचं म्हटलंय. सोनी सिक्स, जे फुटबॉल वर्ल्डकपचे प्रसारण करत असल्याने तो ही क्रिकेट मॅचचे प्रसारण करण्यास इच्छूक नाहीय.



* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Friday, June 13, 2014, 17:25


comments powered by Disqus