Last Updated: Tuesday, February 18, 2014, 08:54
वेलिंग्टन कसोटीत टीम इंडियासमोर सामना वाचवण्याचं आव्हान आहे.
न्यूझीलंडच्या गोलंदाजांनी शिखर धवन, मुरली विजय आणि चेतेश्वर पुजाराला स्वस्तात बाद केलं आणि टीम इंडियाला खिंडीत गाठलंय.
न्यूझीलंडने भारतासमोर ६७ षटकांत विजयासाठी ४३५ धावांचं ठेवलं.
कसोटी सामन्यात हे आव्हान कठीण मानलं जात होतं. मात्र केवळ दोनच सत्रांचा खेळ उरला होता, यामुळे भारताला सामना अनिर्णीत राखण्याची संधी होती.
त्या परिस्थितीत किवी गोलंदाजांनी शिखर धवनला २ धावांवर आणि मुरली विजय ७ धावांवर तर चेतेश्वर पुजारा १७ धावांवर स्वस्तात माघारी पाठवलं. टीम इंडियासमोर आता सामना वाचवण्याचं आव्हान आहे.
दरम्यान या कसोटीत न्यूझीलंडचा कर्णधार ब्रेण्डन मॅक्युलमने त्रिशतक झळकावलं, तसेच जिमी नीशामने नाबाद शतक केलं. त्यामुळे न्यूझीलंडने दुसऱ्या डावात ८ बाद ६८० धावांची मजल मारली.
न्यूझीलंडचा कर्णधार ब्रेण्डन मॅक्युलमने हा त्रिशतक झळकवणारा न्यूझीलंडचा पहिलाच बॅटसमन आबे.
•
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.•
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.
First Published: Tuesday, February 18, 2014, 08:54