Last Updated: Friday, November 22, 2013, 15:22
www.24taas.com, झी मीडिया, कोच्चीटीम इंडिया आणि वेस्ट इंडिजमध्ये कोच्ची इथं झालेल्या वन डे मॅचमध्ये दोन नवे रेकॉर्ड प्रस्थापित झाले आहेत. एकीकडं रवींद्र जडेजानं यंदाच्या सर्वाधिक विकेट घेण्याचा रेकॉर्ड केलाय. तर सर्वात वेगानं पाच हजार धावा करण्याचा विक्रम विराटनं स्वत:च्या नावावर करुन घेतला आहे. हा टप्पा ओलांडणारा विराट दहावा फलंदाज ठरला आहे.
टीम इंडियाचा खेळाडू विराट कोहलीनं विंडीजविरुद्धच्या कोची वन डेत १२० सामन्यांतील ११४ डावामध्ये ५ हजार धावांचा टप्पा ओलांडला आहे. वेस्ट इंडिजचे दिग्गज फलंदाज विव रिचर्ड्सच्या विक्रमाला त्यानं टक्कर दिली आहे.
आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या पदार्पणापासून विराटच्या कामगिरीनं सर्वांचं लक्ष वेधलं. गुरुवारी झालेल्या विंडीजविरुद्ध पहिल्या वन डे सामन्यात ८६ धावा करत ५ हजार धावांचा टप्पा त्यानं गाठला. विव रिचर्ड्सनं ३० जानेवारी १९८७ला इंग्लंडविरुद्ध मेलबर्न मध्ये ११४ डावांत, ५ हजार धावा पूर्ण केल्या होत्या. ११४ धावात हा टप्पा गाठणारा, विराट हा दुसरा फलंदाज ठरला आहे.
•
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.•
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.
First Published: Friday, November 22, 2013, 15:22