Last Updated: Thursday, June 5, 2014, 16:20
www.24taas.com, झी मीडिया, मुंबईभारतीय क्रिकेट टीम आयसीसी वन डे रँकिंगमध्ये एक स्थानाने मागे पडली असून आता भारताचा तिसरा क्रमांक झाला आहे. पण आनंदाची गोष्ट म्हणजे भारताचा स्टार फलंदाज विराट कोहली अजूनही फलंदाजांच्या यादीत क्रमांक १ वर कायम आहे.
भारताच्या जागेवर आता श्रीलंका दुसऱ्या स्थानावर असून ऑस्ट्रेलिया क्रमांक १ वर कायम आहे. श्रीलंकाने इंग्लडसोबत पाच सामन्यांची मालिका ३-२ जिंकल्यामुळे त्यांना फायदा झाला. त्यांचे आता ११२ गुण झाले आहेत जे भारताचेही आहेत. पण पूर्णांकाच्या गुणांचा विचार केला तर अँजलो मॅथ्यूजच्या संघाने भारताला मागे टाकले आहे.
वैयक्तीक रँकिंगमध्ये भारताचा कर्णधार महेंद्र सिंग धोनी सहाव्या स्थानावर कायम आहे. शिखर धवन एका स्थानाने खाली घसरला असून तो आता आठव्या स्थानावर आहे. रोहित शर्माने २० वे स्थान पटकावून पहिल्या २०मध्ये स्थान कायम ठेवले आहे.
गोलंदाजांमध्ये रविंद्र जडेजा एक स्थान घसरून पाचव्या स्थानावर पोहचला आहे. पहिल्या १०मध्ये तो एकमेव भारतीय खेळाडू आहे.
*
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.*
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.
First Published: Thursday, June 5, 2014, 16:20