Last Updated: Tuesday, February 11, 2014, 15:36
www.24taas.com, झी मीडिया, बंगळुरुटी-२० वर्ल्ड कप आणि एशिया कपसाठी भारतीय टीमची घोषणा कऱण्यात आली आहे. ईशांत शर्माला टी-२० आणि वन-डे टीममधून डच्चू देण्यात आला आहे. तर सिक्सर किंग युवराजचं टीम इंडियामध्ये कमबॅक केलं आहे.
सातत्यानं अपयशी ठरलेल्या सुरेश रैनाला वन-डे टीमधून बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला आहे. तर टी-२०वर्ल्ड कपमध्ये त्याला आपलं स्थान कायम राखण्यात यश मिळालं आहे. टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाचं सिलेक्शन बंगळुरुमध्ये आज झालं. मार्चमध्ये होणा-या एशिया कपसाठीही भारतीय टीमची निवड करण्यात आली आहे.
टी-२० संघात रैनाचं स्थान कायम आहे. युवराज सिंगचाही टी-२० विश्वचषकासाठी संघात समावेश झाला आहे. बंगळुरूमध्ये झालेल्या निवड समितीच्या बैठकीनंतर दोन्ही स्पर्धांसाठी भारतीय संघ जाहीर करण्यात आले.
टी-२० संघ महेंद्रसिंग धोनी (कर्णधार), शिखर धवन, रोहीत शर्मा, विराट कोहली, सुरेश रैना, युवराज सिंग, अजिंक्य रहाणे, रवींद्र जाडेजा, आर. अश्विन, भुवनेश्वर कुमार, मोहम्मद शमी, स्टुअर्ट बिन्नी, अमित मिश्रा, मोहीत शर्मा आणि वरूण अॅरोन
आशिया कप संघमहेंद्रसिंग धोनी (कर्णधार), शिखर धवन, रोहीत शर्मा, विराट कोहली, चेतेश्वर पुजारा, अंबती रायडु, अजिंक्य रहाणे, रवींद्र जाडेजा, आर. अश्विन, भुवनेश्वर कुमार, स्टुअर्ट बिन्नी, अमित मिश्रा, वरूण अॅरोन, मोहम्मद शमी, आणि ईश्वर पांडे
•
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.•
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.
First Published: Tuesday, February 11, 2014, 15:25