इंग्लंडची २०७ धावांची आघाडी, India v England, kolkata

इंग्लंडची २०७ धावांची आघाडी

इंग्लंडची २०७ धावांची आघाडी
www.24taas.com, कोलकाता

कोलकाता कसोटीत तिसऱ्या दिवसअखेर इंग्लंडनं ६ बाद ५०९ धावा केल्या होत्या. आज इंग्लंडचे तळातील खेळाडू फारशी चमक दाखवू शकलेलेन नाहीत. इंग्लंडची टीम ५२३ वर ऑलआऊट झाली. मजल मारली आहे. इंग्लंडने २०७ धावांची आघाडी घेतलीय.

भारताविरुद्धच्या तिसऱ्या कसोटीत इंग्लंडकडून कर्णधार अॅलिस्टर कूकने (१९०), ट्रॉट (८७), कॉम्पटन (५७) आणि पीटरसन (५४) यांनी चांगली बॅटिंग केली. इंग्लंडला हादरा देताना भारताकडून ओझाने ४ तर अश्विनने ३ विकेट घेतल्या.

कर्णधाराला साजेही खेळी करणाऱ्याचा प्रयत्न कूकने केला. कूकचं द्विशतक अगदी थोडक्यात हुकलं. विराट कोहलीच्या डायरेक्ट थ्रोवर कूक धावचीत झाला. कूकनं ३७७ चेंडूंचा सामना करत१९० धावांची खेळी केली.

धावफलक

भारत दुसरा डाव - ८६/० (२१.०)
इंग्लंड पहिला डाव - ५२३
भारत पहिला डाव - ३१६

First Published: Saturday, December 8, 2012, 11:00


comments powered by Disqus