भारत ऑस्ट्रेलिया चौथी वन-डे आज रांचीत रंगणार , India vs Australia 2013: Ranchi ODI

भारत ऑस्ट्रेलिया चौथी वन-डे आज रांचीत रंगणार

भारत ऑस्ट्रेलिया चौथी वन-डे आज रांचीत रंगणार
www.24taas.com, वृत्तसंस्था, रांची

भारत ऑस्ट्रेलिया यांच्यातील चौथी वन-डे रांचीमध्ये रंगणार आहे. भारताला या सीरिजमध्ये कमबॅकचं आव्हान असणार आहे. भारत सीरिजमध्ये १-२ नं पिछाडीवर आहे. मॅचममध्ये भारताला कमकबॅकचं आव्हान असणार आहे. रांचीमध्ये मॅच होणार असल्यानं कॅप्टन कूल महेंद्रसिंग धोनीच्या कामगिरीकडे सा-यांचच लक्ष असणार आहे.

मोहाली वन-डेमध्ये सपाटून मार खावा लागल्यानंतर टीम इंडियाला ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सीरिजमध्ये कमबॅक करण्याचं मोठं आव्हान असेल. तिस-या वन-डेमध्ये बॉलर्सबरोबरच बॅट्समनच्याही मर्यादा स्पष्यट झाल्या होत्या. महेंद्रिसंग धोनी आणि विराट कोहली यांचा अपवाद वगळता एकाही बॅट्समनला चमकदार कामगिरी करता आली नव्हती. धोनीनं सेंच्युरी झळकावत आपला फॉर्म सिद्ध केला होता. त्यामुळे त्याच्या होम ग्राऊंडवर धोनीकडून अशाच कामगिरीच्या पुनरावृत्तीची अपेक्षा असणार आहे.

ईशांत शर्माच्या स्वैर मा-यामुळे टीम इंडियाला मोहाली वन-डे गमावी लागली होती. आता त्याला प्लेईगं इलेव्हनमध्ये पुन्हा संधी मिळते की, धोनी त्याला टीममधून डच्चू देतो ते पाहण महत्वाच ठरणार आहे. शॉर्ट पिच बॉलिंग ही भारतीय बॅट्समनची कमजोरी आहे. कांगारु बॉलर्सनी भारताची हीच कमजोरी अचुक हेरत शॉर्ट पिच बॉलिंगचा मार केला होता. त्यामुळे भारतीय टीमला या मॅचममध्ये आपली कामगिरी सुधारावीच लागणार आहे.

टीम इंडियाचा स्पिन माराही बोथट झाला आहे. आर. अश्विन आणि रवींद्र जाडेजासमोर कांगारु बॉट्समनना वेसण घालण्यात सपशेल अपयश ठरले आहेत. तर दुसरीकडे कांगारुंची टीम शानदार कामगिरी करतेय. त्यामुळे सात वन-डे मॅचेसच्या सीरिजमध्ये आपली आघाडी वाढवण्यासाठी जॉर्ज बेलीची टीम प्रयत्नशील असेल. आता धोनी नव्या रणनीतीसह टीम इंडियाला सीरिजमध्ये कमबॅक करून देण्यात यशस्वी ठरतो. की, कांगारु आपली विजयी मालिका कायम राखतात ते पाहण महत्वाच ठरणार आहे.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Wednesday, October 23, 2013, 08:59


comments powered by Disqus