Last Updated: Friday, February 21, 2014, 12:24
www.24taas.com, झी मीडिया, दुबई अंडर १९ वर्ल्ड कपमध्ये गतविजेत्या भारताची क्वार्टर फायनलसाठी येत्या शनिवारी इंग्लंडशी दुबईत लढत होईल. दुसरा सामना शारजात पाकिस्तान आणि श्रीलंका यांच्यात होईल. भारताने अ गटात सलग तीन सामने जिंकून अव्वल स्थान मिळविले.
भारताने तिसऱ्या सामन्यात पापुआ न्यू गिनीवर २४५ धावांनी मात केली. गटात पाकिस्तानने दुसरा क्रमांक मिळविला. भारताने पाकिस्तानवर सलामीलाच ४० धावांनी मात केली.
ड गटात श्रीलंकेने तीन विजयांसह अव्वल स्थान मिळविले. इंग्लंडने दोन विजय आणि एक पराभव अशा कामगिरीसह दुसरे स्थान मिळविले. २३ फेब्रुवारी रोजी उरलेले दोन क्वार्टर फायनलचे सामने होतील. त्यात अफगाणिस्तान आणि दक्षिण आफ्रिका शारजात खेळतील, तर दुबईमध्ये ऑस्ट्रेलिया आणि वेस्ट इंडीज यांचा सामना होईल.
•
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.•
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.
First Published: Friday, February 21, 2014, 10:26