रैनाला योग्य सरावाची गरज, धोनीचा सल्लाIndia vs New Zealand: Has MS Dhoni lost his mojo?

रैनाला योग्य सरावाची गरज, धोनीचा सल्ला

रैनाला योग्य सरावाची गरज, धोनीचा सल्ला
www.24taas.com, वृत्तसंस्था, ऑकलँड

स्ट्रोक प्लेअर असणं चांगली बाब असली तरी बॅट्समनला यशासाठी योग्य शॉटची निवड हे अत्यंत गरजेचं आहे. टीम इंडियाचा कॅप्टन महेंद्र सिंग धोनीनं न्यूझीलंड दोऱ्यातील दुसऱ्या वनडेमध्ये १५ रन्सनी झालेल्या पराभवानंतर सुरेश रैनाला सल्ला दिलाय.

विराट कोहली ३०व्या ओव्हरमध्ये आऊट झाल्यानंतर सर्वांच्या नजरा या धोनी आणि रैनावर होत्या. रैनानं २२ बॉल्सवर ३५ रन्स बनवले आणि एक खराब शॉट मारून स्वत:ची विकेट गमावली. रैनाच्या बॅटिंगबाबत अखेर धोनी बोलला, "रैना आक्रमक बॅटिंग करतो. मात्र आपल्यावर नियंत्रण ठेवणं खूप गरजेचं असतं आपल्याला हे माहिती हवं की आपण कोणत्या दिशेला शॉट मारतोय. जर त्याबाजूला हिट करणं कठीण आहे तर मग दुसऱ्या पर्यायावर पण विचार करायला हवा, जर आपला शॉट तसा लागू शकत नसेल तर मोठा शॉट मारण्याची गरजच नाही".

वेस्ट इंडिजच्या विरुद्ध झालेल्या मालिकेतही रैनाचा फॉर्म खराबच होता. रैना या दरम्यान ३९, १७, १६, २८, ०, २३, ३४, १४, ३६, १८ आणि ३५ रन्स करुन आऊट झाला. सेडन पार्कमध्ये तर अतितटीच्या लढतीत रैना खेळायला उतरला होता. मात्र तो टिकू शकला नाही.

धोनी म्हणाला, या मॅचमध्ये रैनानं खराब बॉलवर चांगले शॉट मारले. अपेक्षा आहे की यानंतर त्याचा आत्मविश्वास वाढला असले. सुरेश रैना अजून काही काळ सहाव्या नंबरवरच खेळायला येणार, असा याचा अर्थ लावायचा का? धोनी पुझं म्हणतो आम्हाला काही बाबतीत विचार करायला हवा. मात्र प्रत्येक मॅचसाठी रणणिती बदलता येणार नाही.


इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Friday, January 24, 2014, 09:54


comments powered by Disqus