कोहली आला धावून, India vs newzeland : 2nd day

दुसऱ्या दिवसाअखेर भारत - ५/२८३

दुसऱ्या दिवसाअखेर भारत - ५/२८३
www.24taas.com, बंगळुरू
बंगळुरु टेस्टमध्ये टीम इंडियानं दुसऱ्या दिवसअखेर ५ विकेट्स गमावून २८३ रन्स केले आहेत. भारत न्यूझीलंडच्या अजूनही ८२ रन्स पिछाडीवर आहे. विराट कोहली ९३ रन्सवर आणि कॅप्टन महेंद्रसिंग धोनी ४६ रन्सवर नॉटआऊट आहेत.

भारताच्या टॉप ऑर्डरनं पहिल्या इनिंगमध्ये सपशेल निराशा केली. गौतम गंभीर, चेतेश्वर पुजारा काहीच कमाल करता आली नाही. सचिन तेंडुलकरही पुन्हा एकदा क्लिन बोल्ड झाला. डग ब्रेसवेलनं त्याला १७ रन्सवर बोल्ड केलं. वीरेंद्र सेहवागनं ४३ रन्सची इनिंग खेळली. मात्र, चांगली सुरुवात मिळूनही सेहवागला याचं मोठ्या इनिंगमध्ये रुपांतर करण्यात अपयश आलं. सचिन आऊट झाल्यावर आलेल्या सुरेश रैनानं महत्त्वपूर्ण खेळी करत आपली सातवी हाफ सेंच्युरी पूर्ण केली. रैना आणि कोहलीने सावध खेळी करत चांगली पार्टनरशिप केली. मात्र, ५५ रन्सवर रैनाही पेव्हेलियनमध्ये परतला.

रैना आऊट झाल्यावर बंगळुरू टेस्टमध्ये विराट कोहली टीम इंडियासाठी धावून आला. कोहलीनं टेस्टमधील पाचवी हाफ सेंच्युरी पूर्ण केली. टीम इंडियाची टॉप ऑर्डर पॅव्हेलियनमध्ये परतल्यावर कोहलीने प्रथम रैना तर नंतर धोनीबरोबर निर्णायक पार्टनरशिप करत टीम इंडियाची इनिंग सावरली. कोहलीने नॉटआऊट ९३ रन्स केल्या आहेत.

First Published: Saturday, September 1, 2012, 10:51


comments powered by Disqus