नाईट रायडर विजयी, दिल्लीला लोळवलं... , IPL 6: KKR make a winning start over Delhi Daredevils in opener

नाईट रायडर विजयी, दिल्लीला लोळवलं...

नाईट रायडर विजयी, दिल्लीला लोळवलं...
www.24taas.com, कोलकाता

IPL-6 च्या पहिल्या सामन्यात गौतम गंभीरच्या गतविजेत्या कोलकाता नाईट रायडर्सने महेला जयवर्धनेच्या दिल्ली डेअरडेव्हिल्स संघाला 6 गड्यांनी नमवले. फिरकीपटू सुनील नारायण (13 धावांत 4 विकेट) आणि कर्णधार गौतम गंभीर (29 चेंडूंत 1 षटकार आणि 5 चौकारांसह 42 धावा) हे विजयाचे शिल्पकार ठरले.

दिल्लीने प्रथम फलंदाजी करताना सर्वबाद 128 धावा काढल्या. प्रत्युत्तरात केकेआरने हे लक्ष्य 18.4 षटकांत 4 गड्यांच्या मोबदल्यात गाठले.

गंभीरशिवाय केकेआरकडून जॅक कॅलिस (20 चेंडूंत 5 चौकारांसह 23 धावा), मनोज तिवारी (23 चेंडूंत 23 धावा), इयान मोर्गन (नाबाद 14) आणि युसूफ पठाण (16 चेंडूंत एका षटकारासह नाबाद 18 धावा) यांनीही विजयात योगदान दिले.

First Published: Thursday, April 4, 2013, 11:21


comments powered by Disqus