Last Updated: Wednesday, April 11, 2012, 08:22
केव्हिन पीटरसन आणि वीरेंद्र सेहवाग यांची तुफान फटकेबाजी चेन्नई सुपर किंग्जला आसमान दाखविले. आयपीएलचा बादशा म्हणून ओळखणारा चेन्नई सुपर किंग्ज संघ वीरेंद्र सेहवागच्या दिल्ली डेअरडेव्हिल्ससमोर दुबला दिसला. प्रथम फलंदाजी करताना खेळाडूंनी नांगी टाकली. दिल्ली डेअरडेव्हिल्स चेन्नई सुपर किंग्जला आठ विकेट्सनी पराभवाचा दणका दिला. चेन्नईचे १११ धावांचे आव्हान दिल्लीने दोन विकेट्स गमावून अवघ्या १३.२ षटकांत पार केले.