Last Updated: Sunday, May 25, 2014, 23:30
www.24taas.com, झी मीडिया, मुंबईमुंबई इंडियन्स आणि राजस्थान रॉयल्समध्ये रंगलेली आजची मॅच अतिशय दमदार अशी झाली. प्ले ऑफला क्वालिफाय होण्यासाठी मुंबईनं प्रयत्नांची पराकाष्ठा केली. मात्र अखेरच्या बॉलवर दोन रन्स ऐवजी एक मिळाला आणि स्कोअर टाय झाला. मग मुंबईला मिळाला तो सुवर्ण संधीचा बॉल... त्या एका बॉलवर 4 रन्स हवे होते आणि आदित्य तरेनं षटकार ठोकला... एका बॉलवर षटकार मारून आदित्य ठरला हिरो... आणि मुंबई इंडियन्स प्ले ऑफसाठी क्वालिफाय झाली. तर राजस्थान रॉयल्सचं आव्हान संपुष्टात आलं.
*
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.*
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.
First Published: Sunday, May 25, 2014, 20:15