आयपीएल लिलावः युवीचा १४ कोटीचा सौदा, IPL AUCTION LIVE: Yuvi sold to RCB at 14 crore, Bhuvi to Sunris

आयपीएल लिलावः युवीचा १४ कोटीचा सौदा

आयपीएल लिलावः युवीचा १४ कोटीचा सौदा
www.24taas.com, झी मीडिया, बंगळुरू
भारताचा ऑलराऊंडर युवराज सिंह आज आयपेलच्या खेळाडूंच्या लिलावात पहिल्या चार राऊंडमध्ये सर्वाधिक १४ कोटी रुपयांमध्ये विकला गेला. त्याला बंगळुरू रॉयल चॅलेंजर्सने विकत घेतले. तामिळनाडूचा विकेट किपर दिनेश कार्तिकला धक्कादायकरित्या दिल्ली डेअरडेव्हिल्सने १२.५ कोटी रुपयांमध्ये खरेदी केले.

विवादास्पद फलंदाज केविन पीटरसनला दिल्ली डेअरडेव्हिल्सने नऊ कोटी रुपयांना खरेदी केले. गेल्या सत्रात तो याच संघाकडून खेळत होता. पीटरसनचे करिअर अशेजनंतर संपले होते.

ऑस्ट्रेलियाचा गोलंदाज मिशेल जॉन्सन याला किंग्ज इलेवन पंजाबने ६.५ कोटी रुपयांना खरेदी केले. मुरली विजयला दिल्ली डेअरडेव्हिल्सने ५ कोटी रुपयांना खरेदी केले. जॅक कॅलिसला कोलकत्ता नाइट रायडर्सने ५.५ कोटी रुपयांना खरेदी केले. रॉबिन उथप्पा याला कोलकत्ता नाइट रायडर्सने ५ कोटी रुपयांना विकत घेतले. वेस्ट इंडिजचा फलंदाज ड्वेन स्मिथ याला चेन्नई सुपरकिंग्ज याने ४.५ कोटी रुपयांना खरेदी केले. अमित मिश्राला सनराइजर्स हैदराबादने ४.२५ कोटींना खरेदी केले. एरॉन फिन्च याला सनराइजर्स हैदराबादने ४ कोटी रुपयांना खरेदी केले.

दोन दिवसांमध्ये ५१४ खेळाडूंचा लिलाव होणरा आहे. त्यात ३१८ भारतीय खेळाडू आहे. ज्यात अनकॅप्ड (राष्ट्रीय टीमकडून न खेळणाऱ्या) खेळाडूंचाही समावेश आहे. यांचा लिलाव पहिल्यांदा होणार आहे.

किंग्ज इलेवन पंजाबची सह मालकीण अभिनेत्री प्रिती झिंटा, कोलकता नाइटरायडर्सची मालकीण जुही चावला, व्यवसायीक विजय मल्ला, नीता अंबानी, राहूल द्रविड, अनिल कुंबळे यावेळी उपस्थित होते.

श्रीलंकेचा माजी कर्णधार महेला जयवर्धने आणि न्यूझीलंडचा माजी कर्णधार रॉस टेलर यांना कोणीही खरेदी केले नसल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. ऑस्ट्रेलियाचा विकेटकीपर मॅथ्यू वेड आणि फलंदाज डेव्हिड हसीलाही कोणीच खरेदी केलं नाही.

लिलावाचे संपूर्ण राऊंड पूर्ण झाल्यावर खेळाडूंचा पुन्हा लिलाव केला जाईल.

या पर्वातील सर्वात जास्त म्हणजेच तब्बल १४ कोटींची बोली लागली. विजय मल्ल्यांच्या बेंगळुरू रॉयल चॅलेंजर्सने युवराजला आपल्या चमूत खेचले. तर आक्रमक फलंदाज वीरेंद्र सेहवागला किंग्स इलेव्हन पंजाबने अवघे ३.२ कोटी मोजून खरेदी केले.

आयपीएल लिलावः कोणता माल कोणी विकत घेतला....

* युवराज सिंग - रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू - १४ कोटी

* दिनेश कार्तिक - दिल्ली डेअरडेव्हिल्स - १२.५ कोटी

* केव्हिन पीटरसन - दिल्ली डेअरडेव्हिल्स - ९ कोटी

* मिचेल जॉन्सन - किंग्ज इलेव्हन पंजाब - ६.५ कोटी

* जॅक कॅलिस - कोलकाता नाइट रायडर्स - ५.५ कोटी

* डेव्हीड वॉर्नर - सनरायजर्स हैदराबाद - ५.५ कोटी

* मुरली विजय - दिल्ली डेअरडेविल्स - ५ कोटी

* रॉबिन उथप्पा- कोलकाता नाइट रायडर्स - ५ कोटी

* फाफ ड्युप्लेसिस - चेन्नई सुपर किंग्ज - ४.७५ कोटी

* ब्रँडन मॅक्कलम - चेन्नई सुपर किंग्ज - ३.२५ कोटी

* जॉर्ज बेली - किंग्ज इलेव्हन पंजाब - ३.२५ कोटी

* डॅरेन सामी - सनरायइजर्स हैदराबाद - ३.०५ कोटी

* वीरेंद्र सेहवाग - किंग्ज इलेव्हन पंजाब - ३.०२ कोटी

* मार्ने मॉर्केल – चेन्नई सुपरकिंग्ज – २.८० कोटी

* विनय कुमार – कोलकत्ता नाइट रायडर्स २.८० कोटी

* उमेश यादव – केकेआर – २.६० कोटी

* ब्रॅड हॉग - राजस्थान रॉयल्स - २.४० कोटी

* चेतेश्वर पुजारा- किंग्ज इलेव्हन पंजाब - १.९ कोटी

* राहुल शर्मा, दिल्ली डेअरडेव्हिल्स – १.९ कोटी

* मुथ्यया मुरलीधरन- रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू – १ कोटी

* रॉबिन पीटरसन- बोली नाही

* नॅथन मॅक्युलम, बोली नाही

* झहीर खान - मुंबई इंडियन्स

* रॉस टेलर - बोली नाही.

* महेला जयवर्धने - बोली नाही.


आयपीएलच्या लिलावातील वैशिष्ट्ये

- गोलंदाज सैमुअल बैड्रीला 30 लाखांत चेन्नई सुपरकिंग्सने घेतले.

- ऑस्ट्रेलियाचा गोलंदाज ब्रेट लीवर बोली नाही

-जयदेव उनाडकट 2.80 कोटीमध्ये दिल्ली डेयरडेविल्सने खरेदी केले.

-परविंदर अवानाला 65 लाख रुपयांमध्ये किंग्स इलेवन पंजाबने आपल्याजवळ ठेवले.

-आरसीबीने वरुण एरॉनला 2 कोटी रुपयांमध्ये घेतले.

-इंग्लडच्या ल्यूक राइटचा लिलाव झाला नाही.

-मोहित शर्माला चेन्नई सुपर किंग्सने 2 कोटींमध्ये घेतले.

-आशीष नेहराला चेन्नई सुपरकिंग्सने 2 कोटीमध्ये खरेदी केले.

-लक्ष्मीपती बालाजीला 1.80 कोटी रुपयांमध्ये किंग्स इलेवन पंजाबने खरेदी केले..

- आरपी सिंहचा लिलाव झाला नाही.

-लक्ष्मीरत्न शुक्लाला दिल्ली डेयरडेविल्सने 1.50 कोटी रुपयांना खरेदी केले..

-अभिषेक नायरला राजस्थान रॉयल्सने 1 कोटींना खरेदी केले..

-सनराइजर्स हैदराबादने मोएसिस हेनरिकला 1 कोटींना खरेदी केले..

-ल्यूक राइट, रवि बोपारा, डैन क्रिस्चनचा लिलाव झाला नाही.

-कोरी एंडरसनला 4.30 कोटीमध्ये मुंबई इंडियन्सने खरेदी केले.

-मॅक्सवेलला किंग्स इलेवन पंजाबने 6 कोटीमध्ये खरेदी केले..

-मार्वन सैम्युलसन, डैन विलास आणि दिनेश रमादीन, ऐंड्रू फ्लेचर, ऐंड्रू रसेल, ल्यूक रोंची, प्रसन्ना जयवर्धने, टिम पेन, मार्टिन गुप्टिल, तमीम इकबाल, बद्रीनाथ, इयान बेल यांनाही कोणीच खरेदी केले नाही.

-ब्रँडन टेलरला सनराइजर्सने 30 लाखांत खरेदी केले.

-सौरभ तिवारीला 70 लाखांमध्ये दिल्ली डेयरडेविल्सने खरेदी केले..

-डैरन ब्रावो आणि कैमरन वाइटने कोणीच खरेदी केले नाही..

- मुथैया मुरलीधरनला 1 कोटींना खरेदी केले.

-रॉबिन पीटरसनला कोणीच खरेदी नाही.

-राहुल शर्मा दिल्ली डेयर डेविल्सने 1.90 कोटींमध्ये खरेदी केले..

-प्रज्ञान ओझाला मुंबई इंडियंसने 3.25 कोटींमध्ये खरेदी केले..

-प्रवीण कुमारला कोणीच खरेदी केले नाही.

-उमेश यादवला कोलकाता नाइट राइडर्सने 2.60 कोटींना खरेदी केले.

-रवि रामपॉलला आरसीबीने 90 लाखांत खरेदी केले..

-मोहम्मद शामीला दिल्ली डेयरडेविल्सला 4.25 कोटींमध्ये खरेदी केले.

-भुवनेश्वर कुमारला सनराइज हैदराबादने 4.25 कोटीमध्ये खरेदी केले.

-इशांत शर्माला सनराइजने 2.60 कोटींमध्ये खरेदी केले.

-अशोक डिंडाला आरसीबीने 1.50 कोटींमध्ये खरेदी केले..

-मिशेल स्टार्क आरसीबीने 5.00 कोटींना खरेदी केले..

-साकिब अल-हसन कोलकाता नाइट राइडर्सने 2.80 कोटींना खरेदी केले.

-अजहर महमूदला कोणीच खरेदी केले नाही.

-तिलकरतने दिलशानलाही कोणीच खरेदी केले.

-इरफान पठानला सनराइज हैदराबादने 2.40 कोटींना खरेदी केले..

एंजेलो मैथ्यूला कोणीच खरेदी केले.

-डेविड हसीला कोणीच खरेदी केले.

-दक्षिण अफ्रीकी ऑलराउंडर एल्बी मार्केलला आरसीबीने 2.40 कोटींना खरेदी केले..

-थिसारा परेराला किंग्स इलेवन पंजाबने 1.60 कोटींना खरेदी केले..

-यूसुफ पठानला कोलकाता नाइट राइडर्सने 3.25 कोटींना खरेदी केले..

-ब्रॉड हॉगला राजस्थान रॉयल्सने 2.40 कोटींना खरेदी केले.
-
रॉबिन उथप्पाला कोलकाता नाइट राइडर्सने 5 कोटींना खरेदी केले..

-जेपी ड्यूमिनीला दिल्ली डेयर डेविल्सने 2.20 कोटींना खरेदी केले..

-चेतेश्वर पुजाराला किंग्स इलेवन पंजाबने 1.90 कोटींमध्ये खरेदी केले..

-एरॉन फिंचला सनराइजर्स हैदराबादने 4 कोटींना खरेदी केले.

-युवराज सिंहनंतर सर्वात महाग खेळाडू दिनेश कार्तिक 12.5 कोटींमध्ये विकला गेला.

-अमित मिश्राला सनराइजर्स हैदराबादने 4.75 कोटींमध्ये खरेदी केले..

-माइकल हसीला मुंबई इंडियंसने 5 कोटींना खरेदी केले..

-ब्रँडम मॅक्कुलमला चेन्नई सुपर किंग्सने 3.25 कोटींना खरेदी केले.

-जॉनसनला पंजाबने 5.50 कोटींना खरेदी केले..

- सनराइजर्स हैदराबादने डेविड वार्नरला 5.5 कोटी रूपयांना खरेदी केले.






इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Wednesday, February 12, 2014, 12:45


comments powered by Disqus