Last Updated: Wednesday, December 12, 2012, 16:23
www.24taas.com, अहमदाबाद गुजराच्या खेडामधल्या प्रचारादरम्यान बुधवारी मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांच्यासोबत मंचावर टीम इंडियाचा क्रिकेटर इरफान पठान दिसला आणि त्यामुळेच बीसीसीआयचा पारा चढलाय.
इरफान पठान मोदींच्या समर्थनार्थ मैदानात उतरलाय. २००७ मध्ये टी-२० वर्ल्ड कप जिंकल्यानंतर गुजरात सरकारनं इरफान पठान आणि त्याचा भाऊ युसूफ पठान यांच्यासाठी विशेष पुरस्काराची घोषणा केली होती. यावरून मोदींवरही बरीच टीका झाली होती. पण, पठान बंधुंबरोबरच टीम इंडियामध्ये समावेश असलेल्या इतर काही खेळाडुंसाठी संबंधित राज्यांनीही पुरस्कार घोषित केले होते.
मुळचा गुजरातच्या वडोदऱ्याचा इरफान पठान सध्या दुखापतीमुळं टीमच्या बाहेर आहे. पण, मोदींच्या सभेच्या मंचावर हजर राहिल्यामुळे इरफानवर मात्र बीसीसीआय चांगलीच खट्टू झालीय.
First Published: Wednesday, December 12, 2012, 16:18