Last Updated: Sunday, December 29, 2013, 18:53
www.24taas.com, झी मीडिया, डर्बनदक्षिण आफ्रिकेच्या जॅक कॅलिसनं आपल्या अखेरच्या टेस्टमध्ये ११५ रन्सची शानदार इनिंग खेळली. अखेरच्या टेस्टमध्ये सेंच्युरी ठोकणारा तो ४० वा आंतरराष्ट्रीय क्रिकेटर ठरला. तर चौथा आफ्रिकन ठरला.
त्याची टेस्ट करिअरमधील ही ४५वी सेंच्युरी आहे. कॅलिसनं आपल्या करिअरमधील शेवटच्या टेस्टमध्ये सेंच्युरी झळकावत दिमाखात क्रिकेटला अलविदा केला. त्याचप्रमाणं टेस्टमध्ये सर्वाधिक रन्स करणाऱ्या बॅट्समनच्या यादीत त्यानं तिसऱ्या क्रमांकावर झेप घेतली.
कॅलिसनं भारताच्या राहुल द्रविडला मागं टाकलं. कॅलिसच्या १६६टेस्टमध्ये १३,२८९ रन्स आहेत. तर राहुल द्रविडचे १६४ टेस्टमध्ये १३,२८८ रन्स आहेत.
•
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.•
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.
First Published: Sunday, December 29, 2013, 18:53